फलटण नगर अभियंत्यांच्या कामाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:29+5:302021-08-22T04:41:29+5:30

फलटण : ‘उद्धटपणे गैरवर्तणूक करणाऱ्या आणि अनेक विकासकामांत गैरव्यवहार करणाऱ्या फलटण नगरपरिषदेचे नगर अभियंता पंढरीनाथ साठे यांच्या कामाची चौकशी ...

Investigate the work of Phaltan Municipal Engineers | फलटण नगर अभियंत्यांच्या कामाची चौकशी करा

फलटण नगर अभियंत्यांच्या कामाची चौकशी करा

Next

फलटण : ‘उद्धटपणे गैरवर्तणूक करणाऱ्या आणि अनेक विकासकामांत गैरव्यवहार करणाऱ्या फलटण नगरपरिषदेचे नगर अभियंता पंढरीनाथ साठे यांच्या कामाची चौकशी करून कडक कारवाई करावी,’ अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे सत्ताधारी गटाचे नगरसेवक अजय माळवे यांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केलेली आहे.

याबाबत अजय माळवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १० मध्ये कैकाडवाडा परिसरात रुपये दहा लाखांपर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे ठरले होते. त्या पद्धतीने त्या कामाचा आराखडा करण्यात आला. हे काम पूर्ण झाले असून, त्या कामापैकी वीस ब्रास काम शिल्लक आहे. ज्या वेळेला आराखडा करण्यात आला. त्या वेळेस नगर अभियंता पंढरीनाथ साठे यांनी आराखडा दहा लाखांपर्यंत असल्याचे सांगितले. परंतु ते काम आठ लाखांचेच आहे. त्या वेळेसच जर त्यांनी या कामाची रक्कम ही आठ लाख होणार आहे, याबाबत यापूर्वी त्यांनी कल्पना दिली असती तर या कामामध्ये प्रभागातील इतर ठिकाणी शिल्लक काम करता आले असते किंवा प्रभागातील त्या कामाशेजारीच कामे यादीमध्ये घेतली असती तर त्या ठिकाणची कामे आज रोजी झाली असती.

नगर अभियंता पंढरीनाथ साठे यांनी जास्त इस्टिमेट दाखवून कमी काम केले, याचा अर्थ असा होतो की, त्यांना या कामामध्ये पैसे खायचे होते. वीस ब्रास अजून काम शिल्लक आहे. याची माहिती ठेकेदार प्रवीण भोसले यांनी दिल्याने नगर अभियंता पंढरीनाथ साठे यांना अजून प्रस्ताव दाखल करून व दहा टक्के वाढीव धरून प्रभागातील उर्वरित तीन बोळांमधील पेव्हिंग ब्लॉकचे काम करण्यास वारंवार सांगूनही उद्धटपणे वागून या कामाची बिले काढली आहेत. साठे यांच्या अशा वागणुकीमुळे फलटणकर नागरिक विकासकामांपासून वंचित राहत आहेत. फलटण शहरात अनेक गैरप्रकार केले असून त्यांच्या या कामाची व कामाच्या गुणवत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे केलेल्या अर्जामध्ये नगरसेवक अजय माळवे यांनी केलेली आहे.

Web Title: Investigate the work of Phaltan Municipal Engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.