Remidesivir Satara : रुग्णांसाठीची रेमडीसिविर इंजेक्शन्स चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:55 AM2021-05-15T11:55:10+5:302021-05-15T11:57:19+5:30
corona virus Remidesivir Satara : विना परवाना आणि मूळपेक्षा अधिक किमतीला रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन जाणारा प्रशांत सावंत हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनची चोरी करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तर याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिविरच्या १२ इंजेक्शन वायल हस्तगत केल्या असून यामध्ये संबंधित रुग्णालयातील काहीजण त्याला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सातारा : विना परवाना आणि मूळपेक्षा अधिक किमतीला रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन जाणारा प्रशांत सावंत हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनची चोरी करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तर याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिविरच्या १२ इंजेक्शन वायल हस्तगत केल्या असून यामध्ये संबंधित रुग्णालयातील काहीजण त्याला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखेस मिळालेल्या माहित्या आधारे सोमवारी रात्री शहरातील समर्थ मंदिर परिसरात प्रशांत दिनकर सावंत (वय २९) आणि सपना प्रशांत सावंत (वय २५, दोघेही रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना विना परवाना व मूळ विक्री किमतीपेक्षा अधिक दराने देण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन जाताना पकडले होते. त्यानंतर याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे करीत आहेत.
या तपासादरम्यान, रेमडीसिविर इंजेक्शन विक्री केली आहे, असे साक्षीदार निष्पन्न झाले. यामध्ये सौरभ प्रकाश पवार (रा. खेड, सातारा) याने प्रशांत सावंत व सपना सावंत यांना रेमडीसिवीर इंजेक्शन वायल विक्री करण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली होती. तर याप्रकरणात आतापर्यंत पवार याच्याकडून ९ इंजेक्शन्स वायल जप्त करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे एकूण १२ इंजेक्शन वायल जप्त केल्या आहेत. याची किंमत ३५४८० रुपये आहे.
प्रशांत सावंत सर्जीकल वॉर्डचा इनचार्ज...
पोलिसांच्या तपासात प्रशांत सावंत हा शहरातील समर्थ मंदिर परिसरातील एका रुग्णालयातील सर्जिकल वॉर्डचा इनचार्ज आहे. तो दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईक तसेच रुग्णालयाकडून मिळालेली रेमडीसिविरची ६ इंजेक्शन ताब्यात घ्यायचा. इंजेक्शनची एक वायल १०० एमएलची असते.
पहिल्या दिवशी रुग्णाला दोन इंजेक्शन दिली जातात. पण, सावंत हा रुग्णाला एक देऊन दुसरी स्पेअर करुन ती घरी नेऊन ठेवत होता. त्यानंतर रुग्णाला उर्वरित देण्यात येणाऱ्या ४ रेमडेसिविर इंजेक्शन वायल एक दिवसाआड देऊन २ स्पेअर करीत असे. तसेच या मध्ये रुग्णालयातील काही स्टाफ सावंतला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.