बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीला अडकविण्यासाठी मेहुण्याचा 'मास्टर प्लॅन', प्रेयसीला संपवून अडकवायचे होते दाजीला! पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 05:51 PM2022-01-05T17:51:02+5:302022-01-05T17:51:29+5:30

चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी भयावह आणि उत्कंठा निर्माण करणारी घटना कऱ्हाड तालुक्यातील कोरेगावात घडली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला; पण हत्या झालेली युवती कोण, येथूनच तपासाला सुरुवात झालेली.

An investigation has been launched into the murder of a young woman in Koregaon in Karad taluka satara | बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीला अडकविण्यासाठी मेहुण्याचा 'मास्टर प्लॅन', प्रेयसीला संपवून अडकवायचे होते दाजीला! पण..

बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीला अडकविण्यासाठी मेहुण्याचा 'मास्टर प्लॅन', प्रेयसीला संपवून अडकवायचे होते दाजीला! पण..

googlenewsNext

संजय पाटील

कऱ्हाड : बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीला अडकविण्यासाठी त्याने ‘प्लॅन’ केला. काट्यानेच काटा काढायचे ठरवून त्याने सुरुवातीला प्रेयसीला संपवले आणि तिच्याजवळ दाजीच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून तो पसार झाला. एवढे सगळे केल्यावर दाजी हमखास अडकेल, असे त्याला वाटलेले; पण पोलिसांनी त्याला गाठलेच.

चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी भयावह आणि उत्कंठा निर्माण करणारी घटना कऱ्हाड तालुक्यातील कोरेगावात घडली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला; पण हत्या झालेली युवती कोण, येथूनच तपासाला सुरुवात झालेली. युवतीच्या कपड्यात आढळलेल्या चिठ्ठीवर एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख होता. त्यामुळे त्या व्यक्तीचा आणि या युवतीचा संबंध काय, असा प्रश्न निर्माण झाला.

पोलिसांनी तातडीने त्यांनी त्या व्यक्तीला गाठले; पण ती व्यक्ती संबंधित युवतीला ओळखतच नव्हती. त्यामुळे पोलीस थबकले. पुढे काय, हा प्रश्न असतानाच त्या व्यक्तीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मेहुणा शरद ताटे याने ही हत्या केली असावी, असा संशय त्याने व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी थेट मेहुण्यालाच गाठले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर घटनेची एक-एक कडी सुटत गेली. शरद ताटे याने ही हत्या केली असून दाजीला त्यामध्ये अडकविण्याचा त्याचा कट होता, असे तपासातून स्पष्ट झाले.

येरवळे ते कोरेगाव ‘व्हाया’ बेलवडे

शरद ताटे हा येरवळेत राहतो. तर प्रेयसी बेलवडे हवेलीत राहण्यास होती. रविवारी सायंकाळी शरद दुचाकीवरून बेलवडेत गेला. तेथून दोघे कोरेगावमध्ये आले होते.

‘ती’ नकोशी झालेली..!

शरदने ज्या युवतीची हत्या केली तिच्याशी त्याचे संबंध होते. मात्र, सध्या ती त्याला नकोशी झालेली. त्यामुळे तिला संपवायचे आणि दाजीला अडकवायचे, असा शरदचा कट होता.

दोघांनी केले मद्यप्राशन

ज्या शिवारात शरदने प्रेयसीची हत्या केली ते ठिकाण निर्जन असते. याच संधीचा गैरफायदा घेत रात्री साडेसात वाजता त्या ठिकाणी पोहोचलेल्या शरदने प्रेयसीची हत्या केली. मात्र, तत्पूर्वी त्या दोघांनी तेथेच बसून मद्यप्राशन केले.

आधी गळा दाबला, नंतर दगड घातला!

शरदने आधी युवतीचा गळा दाबला. त्यामध्ये मृत्यू होऊन तीची हालचाल थांबलेली; पण तरीही ती जिवंत राहूच नये, यासाठी त्याने दगड उचलून तिच्या डोक्यात घातल्याचे समोर आले आहे.

Web Title: An investigation has been launched into the murder of a young woman in Koregaon in Karad taluka satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.