पाटणच्या बाजारपेठेत कोरोनाला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:13 AM2021-02-21T05:13:51+5:302021-02-21T05:13:51+5:30
जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असल्याने निर्बंध कमी करून हळूहळू बाजारपेठ, हॉटेल, पर्यटन आणि एसटी वाहतूक सुरू करण्यात ...
जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असल्याने निर्बंध कमी करून हळूहळू बाजारपेठ, हॉटेल, पर्यटन आणि एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक कोरोना हद्दपार झाल्यासारखे बिनधास्त कोणतीही काळजी न घेता पाटण शहरात आणि बाजारपेठेत वावरताना दिसत आहेत. शहराच्या जवळपासच्या गावातील ग्रामस्थही बाजारासाठी शहरात गर्दी करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच शहराच्या मुख्य बाजारपेठेत वाढलेली ही गर्दी पुन्हा नवे संकट निर्माण करणारी ठरू शकते. नागरिकांनी कोरोनाबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नागरिकांनी वेळीच काळजी घेतली नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष अजय कवडे यांनी केले आहे.