पाटण तहसीलच्या पुरवठा शाखेत कोरोनाला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:44+5:302021-03-04T05:12:44+5:30
दरम्यान, याबाबत पुरवठा शाखेतील कर्मचारी कार्यालयात येणाऱ्यांना कोणतीही शिस्त लावत नाहीत. त्यामुळे पुरवठा शाखेतच कोरोनाला निमंत्रण मिळेल की काय, ...
दरम्यान, याबाबत पुरवठा शाखेतील कर्मचारी कार्यालयात येणाऱ्यांना कोणतीही शिस्त लावत नाहीत. त्यामुळे पुरवठा शाखेतच कोरोनाला निमंत्रण मिळेल की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे
पाटण तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा शाखा विभागास अत्यंत अपुरी जागा आहे. त्यामुळे लोकांना आतबाहेर करतानाही मोठ्या गर्दीतून वाट काढावी लागत आहे. त्यातच शिधापत्रिकेची कामे आणि दुकानदारांची कामे करणे ही बाब अत्यंत क्लिष्ट असून त्यासाठी वेळ लागत आहे. पुरवठा शाखेत गेलेल्यांची गर्दी कमी होताना दिसत नाही. सोमवारी तर पुरवठा शाखेत प्रवेश करणे जिकीरीचे होते. याबाबत तहसीलदारांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
- चौकट
रेशनिंग दुकानदार घुटमळतात
पुरवठा शाखेत गेल्यानंतर तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांभोवती बराच वेळ अनेक दुकानदार घुटमळत असलेले दिसतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना बराचवेळ ताटकळत बसावे लागते. याबाबत तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता लोक आमचे ऐकत नाहीत, असे ते सांगत आहेत.
फोटो :
कॅप्शन : पाटण तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (छाया: अरूण पवार)