आनेवाडी, खेड शिवापूरचा टोल वाढला, सातारा-पुणे प्रवास महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:55 AM2019-03-30T11:55:59+5:302019-03-30T12:00:31+5:30

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर दरवाढीचा झटका वाहनचालकांना देण्यात आला आहे. १ एप्रिलपासून हलक्या वाहनांचा पाच रुपये तर जड-अवजड वाहनांचा पंधरा रुपयांपर्यंत टोल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा-पुणे वाहनधारकांना फटका बसणार आहे.

Inwadi, Khed Shivapur's toll increases, Satara-Pune journey will be expensive | आनेवाडी, खेड शिवापूरचा टोल वाढला, सातारा-पुणे प्रवास महागणार

आनेवाडी, खेड शिवापूरचा टोल वाढला, सातारा-पुणे प्रवास महागणार

Next
ठळक मुद्देआनेवाडी, खेड शिवापूरचा टोल वाढला, सातारा-पुणे प्रवास महागणारलहान वाहनांना पाच तर मोठ्या वाहनांना पंधरा रुपयांची वाढ

सायगाव : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर दरवाढीचा झटका वाहनचालकांना देण्यात आला आहे. १ एप्रिलपासून हलक्या वाहनांचा पाच रुपये तर जड-अवजड वाहनांचा पंधरा रुपयांपर्यंत टोल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा-पुणे वाहनधारकांना फटका बसणार आहे.

साताऱ्यापासून अवघ्या शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पुण्याशी सातारकरांची नेहमीच जवळीक राहिली आहे. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण, आयटी तसेच इतर क्षेत्रात साताऱ्यातील शेकडो तरुण पुण्यामध्ये स्थायिक झाले आहेत. त्यातील बहुतांश तरुण शनिवार, रविवारी गावी साताऱ्यात येत असतात. काहीजण एसटीने तर बहुतेकजण तीन-चार जणांमध्ये एखादे खासगी वाहन करून येतात. त्या सर्वांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे, तर अर्धवट पुलांची कामे अशा असुविधा असतानाही टोलशुल्कात सातत्याने वाढ केली जात आहे.

सेवा रस्ते सुस्थित नसल्यामुळे स्थानिक वाहनचालकांना महामार्गावरून प्रवास करावा लागतो. असे असतानाही महामार्गाचे काम पूर्ण न करता केवळ टोल दरवाढ करून वाहनधारकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम सुरू आहे.

                                                       आनेवाडी                      खेड शिवापूर
वाहनांचे प्रकार                           जुने      नवीन                     जुने        नवीन
कार, जीप, व्हॅन                          ६५           ७०                       ९५              १००
हलकी                                       १०५          ११०                     १५०           १५५
बस, ट्रक                                    २२०         २३५                     ३१५           ३३०
अवजड                                      ३४५         ३६०                     ४९५           ५१०
मोठ्या आकारातील                   ४१५          ४३०                    ६००           ६१५
 

टोलनाक्यावरील दरवाढ करण्यास काहीही हरकत नाही; पण त्यासाठी सर्वप्रथम आवश्यक त्या सुविधा, चकाचक रस्ते पुरवावेत. घरगुती कारणांसाठी पुण्याला ये-जा करणाऱ्यांना या दरवाढीमुळे त्रासच सहन करावा लागणार आहे.
- हणमंत शिंदे,
सातारा

Web Title: Inwadi, Khed Shivapur's toll increases, Satara-Pune journey will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.