मुख्य व्हॉल्व्हकडे जाणारा लोखंडी पूल गायब

By Admin | Published: April 25, 2017 10:49 PM2017-04-25T22:49:31+5:302017-04-25T22:49:31+5:30

कास तलाव : पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी, पर्यटकांच्या जिवावर बेतण्याची वर्तविण्यात येत आहे भीती

Ironish pool going to the main valve disappears | मुख्य व्हॉल्व्हकडे जाणारा लोखंडी पूल गायब

मुख्य व्हॉल्व्हकडे जाणारा लोखंडी पूल गायब

googlenewsNext



पेट्री : कास तलावाचा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बहुतांशी पर्यटकांचा ओघ तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे असतो. या मुख्य व्हॉल्व्हकडे जाणारा सांकव पूल पूर्णपणे धोकादायक स्थितीत असला तरी कित्येक तरुणाई, तसेच कुटुंबासमवेत पर्यटक जीव मुठीत धरून या सांकव पुलावरून कसरत करत मुख्य व्हॉल्व्हकडे जातात. दरम्यान, या मुख्य व्हॉल्व्हची दुरवस्था पाहता अपघातचा संभव आहे.
सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास पठार, बामणोली, जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे म्हणून ओळखली जातात. पावसाळ्यात फुलांच्या हंगामात लाखो पर्यटक कास पठारावर पर्यटनासाठी येऊन कास तलावाला देखील भेट देत असतात. दरम्यान, उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात देखील कास तलावावर सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक गर्दी करतात.
उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू झाल्याने कास तलावावर सध्या पर्यटकांची सतत रेलचेल सुरू असून, कास तलाव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. कास तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे जाणाऱ्या सांकव पुलाची दुरवस्था झाली असून, या व्हॉल्व्हकडे जाऊन फोटोसेशन तसेच सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परंतु हा लोखंडी सांकव पूल बऱ्याच ठिकाणी मोडकळीस आल्याने एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कास तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे बऱ्याचदा पाटकरींना देखील व्हॉल्व्ह चालू अथवा बंद करण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागते. तसेच बरेच पर्यटक या व्हॉल्व्हकडे जाऊन सेल्फी व फोटोसेशन करत असतात. पावसाळ्यात वाऱ्याच्या प्रचंड वेगासह सर्वत्र डोळे फिरतील असे पाणी दिसते. याचा अनुभव जवळून घेण्यासाठी काही उत्साही पर्यटक विविध प्रकारे स्टंट व हुल्लडबाजी करत असतात तर उन्हाळ्यात पाणी पातळी खालावल्याने वीस ते पंचवीस फूट खोलीवर मोठी दगडी असून, पाय घसरून तोल न सावरल्यास जीवावर बेतण्याची परिस्थिती उद्भवू शकते. या व्हॉल्व्हकडे जाणाऱ्या पुलाची कित्येक वर्षे दुरवस्था झाली असून हा लोखंडी पूल पूर्णत: मोडकळीस आला आहे. तसेच पूर्णत: गंजलेल्या स्थितीत असलेल्या सांकवाचे लोखंडी पट्ट्या असणारे दोन ते तीन टप्पे निखळून गेले आहेत. अशा परिस्थितीत कित्येक पर्यटक उत्साहाच्या भरात उडी मारून या व्हॉल्व्हकडे जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु या सांकवाचा अंदाज न आल्यास तोल जाऊन एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तत्काळ याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी पर्यटकांतून जोर धरत आहे. (वार्ताहर)

Web Title: Ironish pool going to the main valve disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.