सातारा जिल्ह्यातील १ हजार ३२३ रेशन दुकानांना आयएसओ मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 06:16 PM2022-05-24T18:16:50+5:302022-05-24T18:17:09+5:30

रास्तभाव दुकानदारांना चलन भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुकानदारांचे उत्पन्न वाढण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

ISO certification for 1 thousand 323 ration shops in Satara district | सातारा जिल्ह्यातील १ हजार ३२३ रेशन दुकानांना आयएसओ मानांकन

सातारा जिल्ह्यातील १ हजार ३२३ रेशन दुकानांना आयएसओ मानांकन

Next

सातारा : जिल्ह्यातील पुरवठा विभागातील जिल्हा पुरवठा कार्यालय, ११ तालुका पुरवठा कार्यालये, २० शासकीय धान्य गोदाम व १ हजार ३२३ स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दुकानांना आणि कार्यालयांना नवा लुक मिळाला आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह, पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पुरवठा विभागातील जिल्हा पुरवठा कार्यालय, ११ तालुका पुरवठा कार्यालये, २० शासकीय धान्य गोदाम व १ हजार ३२३ स्वस्त धान्य दुकानांनी आयएसओ मानांकनासाठी कामकाज केले. विविध विभागात १२३७ शकल प्रलंबित होते. त्यापैकी १०३६ शकांची पूर्तता करून ते निर्गत करण्यात आले. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या तालुकानिहाय बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये आयएसओ मानांकनाबाबत सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, रास्तभाव दुकानदार व गोदामातील माथाडी कामगारांना ओळखपत्र व गणवेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले आहे. सर्व २० गोदामांच्या आवारात ५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. गोदाम, तहसील कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात पुरवठ्यांचे सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे. रास्तभाव दुकानदारांना चलन भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुकानदारांचे उत्पन्न वाढण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या कारणांनी मिळाले मानांकन

रास्तभाव दुकान, गोदामे, कार्यालयांची स्वच्छता, रंगरंगोटी, अभिलेख अद्यावतीकरण, दर फलक, साठा फलक, दुकान चालू-बंद करण्याच्या वेळांचे फलक दर्शनी लावणे. अद्ययावत नोंदवह्या, कार्यालय, दुकानांमध्ये सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्र, स्मोक डिटेक्टर, प्रथमोपचार पेटी, लाभार्थ्यांसाठी बैठक व पाण्याची केलेली व्यवस्था बघून आयएसओ मानांकन देण्यात येते.

सीएसी सेंटरमधून मिळणार सुविधा

सीएसी सेंटरच्या माध्यमातून घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे विमान तिकीट बुकिंग, सर्व प्रकारचे लाईट बिल, फोन बिल, पाणी बिल, मोबाईल बिल, डीटीएच रिचार्ज, शेतीविषयक सर्व सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड, रेशन कार्डमधील नावात दुरुस्ती अर्ज आदी प्रकारच्या सुविधा रास्तभाव दुकानदार नागरिकांना देणार आहेत.

Web Title: ISO certification for 1 thousand 323 ration shops in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.