बनगरवाडीत आयसोलेशन सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:01+5:302021-05-14T04:38:01+5:30

वरकुटे-मलवडी : जागतिक कोरोना महामारीची झळ माण तालुक्यातील खेडोपाडी पोहोचू लागल्याने, गावोगावी बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या वर्षी ...

Isolation center started in Bangarwadi | बनगरवाडीत आयसोलेशन सेंटर सुरू

बनगरवाडीत आयसोलेशन सेंटर सुरू

Next

वरकुटे-मलवडी :

जागतिक कोरोना महामारीची झळ माण तालुक्यातील खेडोपाडी पोहोचू लागल्याने, गावोगावी बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या वर्षी एकही कोरोना रुग्ण नसलेले मागील पंधरवड्यात माण तालुक्यातील बनगरवाडी हे गाव हाॅटस्पाॅट बनले असल्याने आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श जनता विद्यालय या ठिकाणी तातडीने कोरोना आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे.

बनगरवाडीत बाधितांची संख्या दिवसेंदिवस अनेक पटीने वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने ‘आपलं गाव, आपली जबाबदारी’ समजून, कर्तव्यदक्ष पोलीस पाटील शहाजी बनगर यांनी तत्काळ हालचाली सुरू करून ग्रामपंचायत सरपंच रंजना बनगर, ग्रामसेवक शिवयोगी वंजारी आणि स्थानिक तरुणांच्या साह्याने,

पदरमोड करून, बनगरवाडीत अद्ययावत आयसोलेशन सेंटर सुुरू केेेले आहे. यामध्ये स्वयंस्फूर्तीने उपचारासाठी डॉ. विकास जगताप यांनी २४ तास रुग्णसेवा सुरू ठेवली असून, उपचाराबरोबरच योगासने, प्राणायाम आणि वेगवेगळ्या छोट्या-छोट्या खेळांंच्या साह्याने रुग्णांवर हसत-खेळत उपचार केले जात आहेत. याठिकाणी सध्या उपचार घेत असलेल्या १५ रुग्णांना प्रोटिन्सयुक्त मांसाहारी जेवण, गरम पाणी याशिवाय दैनंदिन उपयोगी पडणाऱ्या जीवनावश्यक वस्तू मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. आशा सेविका संगीता बनगर व ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णदेव बनगर हे उपचार घेत असलेल्या रुग्णांना चांगली सेवा देत असून, कोरोना योद्ध्यांचे काम बजावत आहेत.

१३वरकुटे मलवडी

फोटो-कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना प्राणायाम, योगासने आदी सराव करून घेताना डॉ. विकास जगताप.

Web Title: Isolation center started in Bangarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.