कार्वेच्या विद्यालयात विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:44+5:302021-06-02T04:28:44+5:30

कार्वेतील या कक्षाच्या लोकार्पणप्रसंगी सरपंच संदीप भांबुरे व तलाठी लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्वे विभागात कोरोना संसर्ग झपाट्याने ...

Isolation room at Carve's school | कार्वेच्या विद्यालयात विलगीकरण कक्ष

कार्वेच्या विद्यालयात विलगीकरण कक्ष

Next

कार्वेतील या कक्षाच्या लोकार्पणप्रसंगी सरपंच संदीप भांबुरे व तलाठी लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्वे विभागात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गत काही दिवसात रुग्णांची संख्या अमर्याद वाढली आहे. संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘होम आयसोलेशन’ न करता गावोगावी संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कार्वे येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने वीस बेडचा विलगीकरण कक्ष उभारला आहे. या कक्षामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. अनेक कुटुंबामध्ये सोयी-सुविधा नसतात. त्यामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कुटुंबीय तसेच इतर ग्रामस्थही बाधित होण्याची शक्यता असते. त्यामुळे विलगीकरण कक्ष अशा रुग्णांना फायदेशीर ठरणार आहे.

फोटो : ०१केआरडी०१

कॅप्शन : कार्वे, ता. कऱ्हाड येथील भास्करराव थोरात विद्यालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. यावेळी सरपंच संदीप भांबुरे व तलाठी लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Isolation room at Carve's school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.