विलगीकरण कक्ष रुग्णांना वरदान ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:42+5:302021-06-01T04:28:42+5:30
तासवडे (ता. कऱ्हाड) येथे विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांच्या हस्ते पार पडला. या वेळी पंचायत ...
तासवडे (ता. कऱ्हाड) येथे विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांच्या हस्ते पार पडला. या वेळी पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, मंडलाधिकारी युवराज काटे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय कुंभार, सरपंच लता जाधव, सुभाष जाधव, अमित जाधव, राजेंद्र जाधव, विकास जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तासवडेतील या विलगीकरण कक्षात १५ बेडची व्यवस्था करण्यात आली असून, गाव या लढ्यासाठी सज्ज झाले आहे. गत काही दिवसांत गावातील बाधितांची संख्या तीसपर्यंत गेली होती. मात्र, सध्या त्यापैकी २४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कोरोनामुक्तीत यश आल्याचे सभापती प्रणव ताटे यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळेत चालू केलेल्या या कक्षात गरज पडल्यास ३० बेडपर्यंत क्षमता वाढवण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, गावातील सर्व व्यावसायिक व ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून हा विलगीकरण कक्ष चालवण्यात येणार आहे. ग्रामपंचायत सदस्या दीपाली जाधव, अश्विनी जाधव, मनीषा जाधव, भारती शिंदे, शहाजी पाटील, संपत चव्हाण उपस्थित होते. अमित जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भीमराव खरात यांनी आभार मानले.
फोटो : ३१केआरडी०१
कॅप्शन : तासवडे (ता. कऱ्हाड) येथील विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.