राज्याच्या तिजोरीतून पैसे आणणे सोपे नाही: रामराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:03 AM2018-09-19T00:03:43+5:302018-09-19T00:03:47+5:30
सातारा : ‘राज्याच्या तिजोरीतून पैसे आणणे वाटते तेवढे सोपे नाही, त्यामुळे मिळालेल्या पैशांतून जी कामे होतात, ती गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी अभियंता मंडळींनी काटेकोर लक्ष ठेवणे आवश्यक आहे,’ असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित केलेल्या आदर्श अभियंता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, बाळासाहेब भिलारे, सभापती राजेश पवार, मनोज पवार, शिवाजी सर्वगोड, वनिता गोरे, मिलिंद कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास श्ािंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे आदींची प्रमुख उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘दर्जेदार रस्ते आणि शेती, उद्योगाला पाण्याची व्यवस्था करण्यावर भर दिल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरांशी जोडला गेला. ग्रामीण भागातला शेतीमाल चांगल्या रस्त्यांमुळे मोठ्या शहरांत पाठवला जाऊ शकतो.
दूध, भाजीपाला हा नाशवंत माल लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते. यासाठी रस्ते चांगले हवेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यांची अवस्था दयनीय आहे. यासाठी रस्ते तयार करतानाच ते दर्जेदार कसे होतील, याकडे अभियंत्यांनीच लक्ष देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाच्या विकासात अभियंत्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. लोकांच्या अपेक्षांना लोकप्रतिनिधी तोंड देतात, त्यासाठी अभियंत्यांचीही साथ हवी.’
‘फलटणपासून साताऱ्यात येणाºया रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. यासाठी मोठे अंतर कापून दुसºया मार्गाने आम्हाला या कार्यक्रमाला यावे लागले. त्यामुळे रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यावर सर्वांनीच भर दिला पाहिजे. रस्ता चांगला नाही, याला केवळ अभियंते जबाबदार नसून लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत.’
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अभियंता दिलीप जाधव, महेश टिकोले, जनार्दन धायगुडे यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी
तेव्हाही गाड्या नव्हत्या
‘कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून झालेल्या धरणांच्या कामावेळी अधिकाºयांना गाड्या नव्हत्याच. आताही गाड्या नसल्याच्या तक्रारी अभियंत्यांकडून येतात. तेव्हा ज्या कंत्राटदाराला कामाचे टेंडर देणार आहात, त्याला अधिकाºयाला वाहन देण्याची ‘कंडिशन’ त्याच्या टेंडरमध्येच घाला, तुम्ही घरात बायकोला घाबरत नाही तर आॅडिटला कसे घाबरता?,’ असे रामराजेंनी सांगताच सभागृहात हशा पिकला.