गडकोटांचा इतिहास जागृत ठेवणे काळाची गरज : लेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:32 AM2021-01-04T04:32:17+5:302021-01-04T04:32:17+5:30

वाई : स्वराज्याचे साक्षीदार असलेले गडकिल्ले हे महाराट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे जतन, संवर्धन व स्मरण करणे काळाची गरज आहे. ...

It takes time to keep the history of Gadkot alive: Lele | गडकोटांचा इतिहास जागृत ठेवणे काळाची गरज : लेले

गडकोटांचा इतिहास जागृत ठेवणे काळाची गरज : लेले

Next

वाई : स्वराज्याचे साक्षीदार असलेले गडकिल्ले हे महाराट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे जतन, संवर्धन व स्मरण करणे काळाची गरज आहे. किल्ले स्पर्धांमधून तरुणाईला इतिहासाचा उजाळा होतो,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते यशवंत लेले यांनी व्यक्त केले.

नवप्रकाश मंडळ

भगवा कट्टा प्रतिष्ठानतर्फे दीपोत्सव २०२० निमित्ताने

आयोजित भव्य किल्ले स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष शादाब हे होते.

२०२० या वर्षामध्ये कोरोना प्रादुर्भाव असतानाही ७८ स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. ज्यामध्ये

स्पर्धकांनी हुबेहुब एकास एक सरस असे किल्ले तयार केलेले होते.

यशवंत लेले म्हणाले, ‘इतिहास जागृत ठेवणे व

जपणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित कार्यकर्ते, मावळे तयार होणे ही काळाची गरज आहे. किल्ले स्पर्धेत भाग घेतलेल्या मावळ्यांसारखेच येणारी पिढी असेल. छत्रपतींना अपेक्षित स्वराज्य निश्‍चितच येईल, याची खात्री वाटते.

स्पर्धेमध्ये मोठ्या गटात समूह गटामध्ये फिल्ट्म ऑटोकॉम कामगार संघ एमआयडीसी वाई प्रथम

क्रमांक (किल्ले सिंधुदुर्ग), शिवछावा ग्रुप सारंग सोसायटी गंगापुरी वाई. द्वितीय क्रमांक (सिंहगड), राजे ग्रुप

फुलेनगर, तृतीय क्रमांक (विजयदुर्ग) तर छावा ग्रुप सिद्धनावाडी (मल्हारगड), शिवसह्याद्री करिअर अकॅडमी सिद्धनावाडी (प्रतापगड), आरजेएम ग्रुप रविवार पेठ यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

मोठ्या गटात पंकज खागे गंगापुरी (राजगड) प्रथम, विश्वजित विनोद जगताप नावेचीवाडी पारगड द्वितीय, अर्जुन संदीप गोंजारी सोनगीरवाडी (अवचितगड) तृतीय, तर साईराज घाडगे गंगापुरी कोरीगड, शंभुराज दीपक शिंगटे

कोरीगड, ओम शिवाजी कदम सोनगिरवाडी (पेबचा किल्ला) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

छोटा गटात आनंद रूपेश शिंदे नावेचीवाडी (बांडकोट) प्रथम, अपूर्व गणेश शिंदे गंगापुरी वाई (बांडकोट) द्वितीय, मितेश संतोष महांगडे गंगापुरी (गोपाळगड) तृतीय, तर विघ्नेश जायगुडे दत्तनगर प्रतापगड, समर्थ जगताप

यशवंतनगर (प्रतापगड), अथर्व भिंगारे जेजुरीकर कॉलनी (प्रतापगड) तर उत्तेजनार्थ सरसेनापती हिरोजी इंदलकर पुरस्कार अनुज सुधाकर ढगे रविवार पेठ (शिवनेरी) यांना देण्यात आले.

हिरकणी पुरस्कार राणी तुषार चक्के ढगेआळी रविवार पेठ (सुवर्णदुर्ग) यांना देण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: It takes time to keep the history of Gadkot alive: Lele

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.