अवकाळी पावसानं झालं होत्याचं नव्हतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:45+5:302021-02-23T04:58:45+5:30

आदर्की : फलटण पश्चिम भागातील आदर्की महसुली मंडलातील आदर्की परिसरात गारपीट अन् अवकाळी पावसाने गहू झोपले, ज्वारी पडल्याने हातचे ...

It was not due to untimely rain ... | अवकाळी पावसानं झालं होत्याचं नव्हतं...

अवकाळी पावसानं झालं होत्याचं नव्हतं...

Next

आदर्की : फलटण पश्चिम भागातील आदर्की महसुली

मंडलातील आदर्की परिसरात गारपीट अन् अवकाळी पावसाने गहू झोपले, ज्वारी पडल्याने हातचे पीक वाया जाऊन होत्याचं नव्हतं झाल्याने शेतकरी हवालदिल

झाला आहे.

फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की महसुली मंडळात रब्बी हंगामात ज्वारी, मका, गहू, हरभरा, करडी आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यावर्षी पेरणीवेळी पाऊस पडल्याने दोन टप्प्यांत पेरणी झाली; परंतु काही शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणी उशिरा होईल म्हणून गहू, हरभरा पेरला, त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा एकाच वेळी काढणीची धांदल फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा व मार्चच्या पहिल्या आठवड्यात होते. पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात असताना बिबी, घाडगेवाडी, मुळीकवाडी, कापशी, आळजापूर, आदर्की खुर्द, आदर्की बुद्रूक, परिसरात

अवकाळी पाऊस व तुरळक गारा, वारा यामुळे गहू भुईसपाट झाल्याने लोंबीत पाणी शिरल्याने गव्हाचा रंग पांढरट पडणार आहे तर पडल्याने उत्पादनात घट होणार आहे. काढणीलायक ज्वारी पडल्याने काढणीस जादा खर्च येणार आहे.

काढलेली ज्वारीबरोबर कडबाही भिजल्याने कणसे व कडबा काळा पडण्याची शक्यता आहे. कांदा, करडई, हरभरा, गहू, मका पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांची पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

२२आदर्की

फोटो -आदर्की परिसरात गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: It was not due to untimely rain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.