विरोधकांचे संभाव्य मनोमिलन नव्हे तर मनीमिलन होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:48+5:302021-06-11T04:26:48+5:30

वडगाव हवेली: विरोधकांचे संभाव्य मनोमिलन नव्हे तर ते मनीमिलन होते. स्वार्थापोटी केलेल्या गोष्टी टिकू शकत नाहीत, असे मत यशवंतराव ...

It was not a possible reunion of opponents, but a reunion | विरोधकांचे संभाव्य मनोमिलन नव्हे तर मनीमिलन होते

विरोधकांचे संभाव्य मनोमिलन नव्हे तर मनीमिलन होते

Next

वडगाव हवेली: विरोधकांचे संभाव्य मनोमिलन नव्हे तर ते मनीमिलन होते. स्वार्थापोटी केलेल्या गोष्टी टिकू शकत नाहीत, असे मत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.

वडगाव हवेली ता. कराड येथे कृष्णा साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत भोसले बोलत होते. यावेळी कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष जगदीश जगताप, उमेदवार सयाजी यादव, बबनराव शिंदे, बाजीराव निकम, जयवंतराव कृष्णा जगताप, आनंदराव मोहिते, उपसरपंच राजेंद्र थोरात, माजी सरपंच सत्यवान जगताप, दिलीप चव्हाण, भानुदास जगताप, शिवराज जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.भोसले म्हणाले , सत्तेत येण्यापूर्वी अडचणीत असणारा कारखाना आमच्या कार्यकाळात आम्ही सुस्थितीत आणला. यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सभासदांना दिलेली वचनपूर्ती करण्यात आम्ही कोठेही कमी पडलो नाही. सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अनेक योजना कारखान्याच्या माध्यमातून राबविल्या. आमच्या संचालक मंडळाच्या काळात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नाही. विरोधकांचे मनोमिलन हे स्वार्थापोटी केलेला प्रयोग असून, तो अयशस्वी होताना दिसतोय.

जगदीश जगताप म्हणाले, ‘‘डॉ.सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा पारदर्शी कारभार सभासदांना पाहायला मिळाला आहे.कारखान्याच्या व सभासदांच्या हितासाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे.’’

यावेळी जयवंतराव जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व सूत्र संचालन अशोक जगताप यांनी केले. श्रीरंग साळुंखे यांनी आभार मानले.

फोटो ओळ-

वडगाव हवेली (ता.कराड) येथे कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणूक बैठकीत सभासदांशी संवाद साधताना डॉ.सुरेश भोसले, समवेत उपाध्यक्ष जगदीश जगताप व इतर.

Web Title: It was not a possible reunion of opponents, but a reunion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.