शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम होणार नाही

By admin | Published: May 8, 2016 09:33 PM2016-05-08T21:33:10+5:302016-05-09T01:08:54+5:30

शिवेंद्रसिंहराजेंची ग्वाही : मेढा येथे शिक्षक संघाच्या वतीने नूतन संचालकांचा सत्कार

It will not work to educate the teachers | शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम होणार नाही

शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम होणार नाही

Next

कुडाळ : ‘जावळीतील शिक्षकांनी शिक्षणाचा जावळी पॅटर्न निर्माण केला. या पॅटर्नने आपली राज्यात ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांवर प्रशासनाकडून वेठीस धरण्याचा प्रकार यापुढे कधीही होणार नाही. शिक्षक संघाची ताकद मोठी असून, शिक्षक संघाच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे राहू,’ अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संघाच्या मेढा येथील शिक्षक बँक संचालकांच्या सत्कार कार्यक्रमात दिली.
यावेळी व्यासपीठावर संघाचे नेते संभाजीराव थोरात, सिद्धेश्वर पुस्तके, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक, जिल्हा बँक संचालक वसंतराव मानकुमरे, शिक्षक बँक उपाध्यक्ष मोहन निकम, अनिल जामकर, बँक संचालक दत्ता कोरडे, शंकर जांभळे, तालुकाध्यक्ष आर. टी. दळवी, बळवंत पाटील, बापूराव गायकवाड, विक्रम डोंगरे, मिलन मुळे, काका जेधे आदी उपस्थित होते.
संभाजीराव थोरात म्हणाले, शिक्षण संस्थेसाठी सुरुवातीपासून मी काम केले. मात्र, संचालकही होता आले नाही. अशा संस्थेवर जिल्ह्यातील व जावळीतील साहेबराव साळुंखे यांची अध्यक्षपदी निवड होते ही अभिमानाची गोष्ट आहे. तर दुष्काळजन्य परिस्थितीमुळे प्रशासकीय बदल्यांना स्थगिती द्यावी, यासाठी शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना भेटून बदल्या होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणार आहे.’
यावेळी शिक्षक बँकेत निवडून आलेल्या संचालकांचे तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संचलित शिक्षण परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साहेबराव साळुंखे यांचा तसेच मच्छिंद्र मुळीक, संदीप किर्वे, अंकुश शिंदे, शिवाजी शिवणकर, विकास बनकर या शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)


मुळीक यांचे नेतृत्व कणखर
मच्छिंद्र मुळीक यांनी जिल्हाध्यक्ष जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली असून त्यांच्या कार्यकाळात संघाची ताकद वाढली आहे, असे गौरवोद्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले. तर मुळीक यांनी बँक संघाच्या ताब्यात घेण्यासाठी खऱ्या अर्थाने परिश्रम घेतले, असे कौतुक थोरात यांनी केले.


मेढा येथे शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते शिक्षक बँक संचालकांचा सत्कार झाला.

Web Title: It will not work to educate the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.