आता बास... शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, शंभूराजेंचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 11:05 AM2021-11-30T11:05:38+5:302021-11-30T11:07:17+5:30

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) राष्ट्रवादीने (NCP) आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली.

It's over ... now Shiv Sena will contest all elections on its own, Shambhuraje Desai's announcement | आता बास... शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, शंभूराजेंचा थेट इशारा

आता बास... शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, शंभूराजेंचा थेट इशारा

Next
ठळक मुद्देसातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) राष्ट्रवादीने (NCP) आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली.

सातारा - राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थीर असून पुढील 25 वर्षे ही युती राहिल असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत सांगतात. मात्र, शिवसेना नेत्यांकडून सातत्याने स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या अनुभवाने महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य करण्यात येते. यापूर्वी, शिवसेना नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करत, आपण महाविकास आघाडीचा नसून फक्त शिवसैनिक असल्याचे म्हटले होते. आता, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) राष्ट्रवादीने (NCP) आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांत शिवसेना (Shivsena) स्वबळावर लढणार असून, येथेही आघाडी धर्म पाळायचा का नाही, हे आता आम्ही ठरवू, असा इशाराच शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. शंभूराजे देसाई यांनी आज शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी, राज्य सरकारच्या 2 वर्षांतील कामाची माहिती देताना, राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.

दरम्यान, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले असून राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला आहे. तर, शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे, शंभूराजे देसाई आज महाविकास आघाडीवर भाष्य करताना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 
 

Web Title: It's over ... now Shiv Sena will contest all elections on its own, Shambhuraje Desai's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.