जीएसटीमुळे यंदा शाडू मुर्ती स्वस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 08:21 PM2017-07-29T20:21:39+5:302017-07-29T20:24:37+5:30
सातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसवर जीएसटी लागु झाल्यामुळे या मुर्तींच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर शाडू माती जीएसटीमध्ये येत नसल्याने शाडूच्या गणपती मुर्तींचे दर स्थिर आहेत. त्यामुळे यंदा पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याची संधी भक्तांना मिळणार असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे.
सातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसवर जीएसटी लागु झाल्यामुळे या मुर्तींच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर शाडू माती जीएसटीमध्ये येत नसल्याने शाडूच्या गणपती मुर्तींचे दर स्थिर आहेत. त्यामुळे यंदा पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याची संधी भक्तांना मिळणार असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. जीएसटीमुळे बाजारपेठेतील ब्रॅण्डेड वस्तुंच्या किंमती वाढल्या असल्या तरीही दुसºया बाजुला स्थानिक वस्तुंवर हा कर नसल्यामुळे याचा फायदा व्यावसायिकांना होत आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसची पोती, विविध प्रकारचे रंग, चकमक, अमेरिकन डायमंड, मोठ्या गणेश मूर्र्तींसाठी काथ्या, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, असा सर्व कच्चामाल व कलाकारांची मजुरी तसेच दोन-तीन महिने न पडलेला पाऊस यामुळे यावर्षी गणेश मूर्तीच्या किमतीतही जीएसटीच्या भरमसाठ करवाढीमुळे वाढ झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या या उत्सवाचे मंडळाच्या कार्यकर्त्यांना आताच वेध लागले आहेत. यावर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांना गतवर्षीच्या तुलनेत जादा खर्च करावा लागणार आहे. कारण यावर्षी उत्सवासाठी लागणाºया गणेश मूर्तीच्या किंमतीत सुमारे २५ ते ३० टक्के वाढ होणार आहे. सध्या गणेश मूर्ती तयार करण्याचे काम ग्रामीण भागातील कुंभारवाड्यासह शहरात व परिसरात जोरदार सुरू आहे. |