जिंती-फडतरवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:35 PM2017-10-11T14:35:18+5:302017-10-11T14:37:35+5:30
फलटण तालुक्यातील जिंती-फडतरवाडी या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या रस्त्याने वाहने चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लगत आहे.
जिंती : फलटण तालुक्यातील जिंती-फडतरवाडी या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या रस्त्याने वाहने चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लगत आहे.
या मार्गावरून वाहनधारकांना प्रवास नकोसा झाला आहे. दुचाकीस्वारांना तर या रस्त्याने खड्डे चुकवत कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी उडत पाहायला आहेत. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार का? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत. तरी लवकर या रस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी होत आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून मार्गावर एसटीही बंद आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिंती-फडतरवाडी या रस्त्याची रुंदी लहान असल्यामुळे वाहने चालताना त्रास होतो. तसेच या मार्गावर साईडपट्ट्याही नाहीत. या मार्गाकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाच्या अधिकाºयांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
जिंती-फडतरवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट लोकवस्ती आहे. गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याचे कोणतेच काम झालेले नाही, याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांमधून होत आहे.