‘कृष्णा’च्या निकालानंतर मलकापुरातील सत्ताकेंद्रात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:00+5:302021-07-02T04:27:00+5:30

मलकापूर : राज्याचे लक्ष केंद्रित झालेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत जाहीर झालेल्या निकालात डॉ. सुरेश भोसले ...

Jallosh at the center of power in Malkapur after the result of 'Krishna' | ‘कृष्णा’च्या निकालानंतर मलकापुरातील सत्ताकेंद्रात जल्लोष

‘कृष्णा’च्या निकालानंतर मलकापुरातील सत्ताकेंद्रात जल्लोष

Next

मलकापूर : राज्याचे लक्ष केंद्रित झालेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत जाहीर झालेल्या निकालात डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलने आघाडी घेत एकतर्फी सत्ता हस्तगत करण्याच्या दृष्टीने आगेकूच केली आहे. निकाल हातात येत होता तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचत होता. पहिल्या निकालापासूनच मलकापुरातील सत्ताकेंद्रात कार्यकर्त्यांचा जल्लोष होत होता. फटाक्याच्या आतिषबाजीसह गुलालाच्या उधळणीसाठी तोफांसह जेसीबी व क्रेनचा वापर केला जात होता. अवघा कृष्णा विद्यापीठ परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.

राज्याचे लक्ष केंद्रित झालेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. दुपारी पहिल्या फेरीत अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या राखीव गटाचे निकाल हाती येताच निर्णायक असे साडेपाच हजाराचे मताधिक्य सहकार पॅनलला मिळाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. दुसऱ्यावेळी महिला राखीव गटाचा निकाल हाती येताच तिच निर्णायक आघाडी कायम ठेवत सहकार पॅनलने विजयाच्या दिशेने आगेकूच केली.

कार्यकर्त्यांनीही भोसले यांच्या मलकापुरातील सत्ताकेंद्राकडे आगेकूच सुरू केली होती. साधारणतः साडेचारच्या सुमारास महत्त्वाचा पहिला टप्पा समजल्या जाणाऱ्या वडगाव हवेली, दुशेरे गटाचा निकाल हाती आला. सहकार पॅनलच्या तिन्ही उमेदवारांनी साडेपाच हजाराचे मताधिक्य राखले. त्याच पध्दतीने सायंकाळी साडेपाच वाजता काले, कार्वे व नेर्ले, तांबवे गटात ही साडेपाच हजाराचे मताधिक्य राखत एकतर्फी सत्ता स्थापनेकडे घोडदौड सुरूच ठेवली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरात जल्लोष केला.

मलकापुरातील सत्ता केंद्रात गुलालाची उधळण, फटाक्याची आतिषबाजी व घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोठ्या संख्येने गोळा झालेल्या कार्यत्यांनी एका बाजूला गुलालाच्या उधळणीसाठी तोफांचे फवारे लावले होते. दुसऱ्या बाजूला जेसीबी व क्रेनचा वापर केला जात होता. काही कार्यकर्ते कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गासह उपमार्गावरून दुचाकीवरून आनंद साजरा करत फेरफटका मारताना दिसत होते.

चौकट

संस्थापक दुसऱ्या तर रयत तिसऱ्या स्थानी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी प्रारंभ झाला. अगदी पहिल्या फेरीपासून सायंकाळी जाहीर झालेल्या नेर्ले तांबवे गटाच्या निकालापर्यंत डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने आघाडी कायम ठेवली होती. तर अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक दुसऱ्या तर डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील रयत तिसऱ्या स्थानावरच राहिले.

फोटो ०१मलकापूर-कृष्णा

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या मलकापुरातील सत्ताकेंद्रात कार्यकर्त्यांचा दिवसभर जल्लोष होत होता. फटाक्यांच्या आतिषबाजीसह गुलालाच्या उधळणीसाठी तोफा, जेसीबीसह क्रेनचा वापर केला जात होता. (छाया : माणिक डोंगरे)

010721\img_20210701_172707.jpg

फोटो कॕप्शन

भोसले यांच्या सहकार पॕनेलच्या मलकापूरातील सत्ताकेंद्रात कार्यकर्त्यांचा दिवसभर जल्लोष होत होता. फाटाक्याच्या आतिषबाजीसह गुलालाच्या उधळणीसाठी तोफांसह जेसीबी व क्रेनचा वापर केला जात होता. अवघा कृष्णा विद्यापीठ कँपस घोषणानी दणानून गेला होता. (छाया-माणिक डोंगरे)

Web Title: Jallosh at the center of power in Malkapur after the result of 'Krishna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.