Dhangar Reservation: खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने निरा दत्तघाट येथे जलसमाधी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 18:20 IST2023-11-20T18:19:18+5:302023-11-20T18:20:36+5:30
लोणंद : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोणंद मधील गणेश केसकर हे नगरपंचायतीसमोर गेली चार दिवस उपोषणाला बसले आहेत. ...

Dhangar Reservation: खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने निरा दत्तघाट येथे जलसमाधी आंदोलन
लोणंद : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोणंद मधील गणेश केसकर हे नगरपंचायतीसमोर गेली चार दिवस उपोषणाला बसले आहेत. मात्र उपोषणाची दखल शासनाकडून घेतली जात नसल्याने आज खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने निरा दत्तघाट येथे जल समाधी आंदोलन करण्यात आले.
शासनाच्या गलथान कारभाराचा निषेध करीत, 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे ' या घोषणा देत अनेक युवक निरा नदीपात्रात जलसमाधीसाठी उतरले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. सुनिल शेळके, माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके, नगरसेवक सागर शेळके, सत्वशील शेळके तसेच खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाचे प्रतिनीधी उपास्थित होते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.