जनाची नाय.. मनाची तरी बाळगा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:41+5:302021-03-05T04:39:41+5:30
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, आरोग्य यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटत आहे. मात्र, नागरिकांना याचे कसलेही गांभीर्य ...
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, आरोग्य यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटत आहे. मात्र, नागरिकांना याचे कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसते. शहरातील मुख्य बाजारपेठ, किराणा दुकान, मंडई, बसस्थानक अशा सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असून, बहुतांश नागरिक मास्क लावण्याचीही तसदी घेत नाहीत. अशा निर्धास्त नागरिकांना ‘जनाची नव्हे; पण मनाची तरी बाळगा’ असं म्हणण्याची वेळ आली आहे.
लॉकडाऊन टाळायचा असेल तर मास्क, शारीरिक अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आरोग्य विभागाकडूनही याबाबत सातत्याने प्रबोधन केले जात आहे; परंतु नागरिकांवर याचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे दिसून येत आहे. साताऱ्यातील मुख्य बाजारपेठ नागरिकांच्या गर्दीने गजबजून जात आहे. किराणा तसेच इतर दुकानांमध्येही ग्राहकांची झुंबड उडत आहे. शहरातील मुख्य बसस्थानकातील अवस्थाही काहीशी अशीच आहे. बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होतच आहे, शिवाय एसटीत जागा पकडण्यासाठी प्रवाशांमध्ये स्पर्धाच लागल्याचे दिसते.
ही गर्दी पाहून सोशल डिस्टन्स हा शब्द केवळ ऐकण्यापुरताच मर्यादित राहिल्याचे दिसते. महाविद्यालयीन तरुणांसह बहुतांश नागरिक व वाहनधारक आजही मास्कविना वावरत आहेत. पोलीस प्रशासनाकडून अशा निर्धास्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईत सातत्य नसल्याने परिस्थिती पुुन्हा जैसे थे होत आहे. स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी सोशल डिस्टन्स पाळा, मास्कचा वापर करा हे नागरिकांना वारंवार सांगावं लागणं यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते.
(चौकट)
कुठे गेले गोल अन् चौकोन
सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे यासाठी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर भाजी विक्रेत्यांपासून ते मोठ-मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनी सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन केले. यासाठी प्रत्येक दुकानाच्या बाहेर पांढऱ्या रंगाचे गोल, चौकोन आखण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच विक्रेते, व्यापाऱ्यांना याचा विसर पडला अन् दुकानाबाहेरील गोल, चौकोनही गायब झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, कारवाईच होत नसल्याने शहरातील दुकाने, बाजारपेठ गर्दीने गजबजून जात आहे.
(चौकट)
पाच दिवसांत ६३९ बाधित; ७ मृत्यू
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली असून, गेल्या पाच दिवसांत तब्बल ६३९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा चिंताजनक असून, नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे बनले आहे.
फोटो : ०४ मास्क / प्रुफला फोल्डर आहे.
०४ जावेद २ : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असून, बसस्थानक प्रवाशांनी असे खचाखच भरत आहे.
० जावेद १/४/५/ : परिवहन विभागाने ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असा निर्णय घेतला असला तरी प्रवाशीच काय तर चालकांनादेखील याचा विसर पडत आहे. एसटीत बसण्यापुरता तोंडाला लावलेला मास्क एसटीत बसताच गायब होत आहे.
०४ जावेद ६ : साताऱ्यातील महाविद्यायीन तरुण-तरुणी मास्क विना असे निर्धास्त वावरताना दररोज दिसून येतात.
०४ जावदे ३ : बसस्थानकात खाद्यपदार्थ विकणाºया विक्रेत्यांकडूनही सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केले जात आहे. (सर्व छाया : जावेद खान)