‘जनशक्ती’ अन् ‘भाजप’मधील वादाचा ‘लोकशाही’कडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:00 AM2018-04-04T01:00:34+5:302018-04-04T01:00:34+5:30

कऱ्हाड : पालिकेत सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेत विषय न घेण्याच्या कारणावरून नाराजीचे नाट्य घडले. ‘जनशक्ती’ने दिलेल्या विषयाचा समावेश विषयपत्रिकेत न केला गेल्याने अखेर जनशक्तीच्या

 'Janshakti' and 'BJP' controversy protested by 'democracy' | ‘जनशक्ती’ अन् ‘भाजप’मधील वादाचा ‘लोकशाही’कडून निषेध

‘जनशक्ती’ अन् ‘भाजप’मधील वादाचा ‘लोकशाही’कडून निषेध

googlenewsNext
ठळक मुद्दे कऱ्हाड पालिका : स्थायीची बैठक रद्द; ‘लोकशाही’ने दिले नगराध्यक्षांना निवेदन

कऱ्हाड : पालिकेत सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेत विषय न घेण्याच्या कारणावरून नाराजीचे नाट्य घडले. ‘जनशक्ती’ने दिलेल्या विषयाचा समावेश विषयपत्रिकेत न केला गेल्याने अखेर जनशक्तीच्या नगरसेवकांनी स्थायीच्या बैठकीकडे पाठ फिरवली. तर सभेचा कोरम पूर्ण न होऊ शकल्याने अखेर सभा रद्द करण्याची नामुष्की नगराध्यक्षांवर आली. या प्रकाराचा ‘लोकशाही’चे नगरसेवक सौरभ पाटील यांनी मंगळवारी नगराध्यक्षा यांना निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदविला.

कऱ्हाड पालिकेत सोमवारी स्थायी समितीची सभा पार पडली. सभेतील विषयपत्रिकेत विषय न घेतल्याच्या कारणामुळे जनशक्तीच्या आठ सदस्यांनी सभेकडे पाठ फिरवली. आतापर्यंत एकमेकांच्या हिताचा विचार करीत शहराच्या विकासाठी मतभेद बाजूला ठेवण्यात येतील, असे सांगत मागील ७ फेब्रुवारी रोजी पालिकेत पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल दोन तास ६३ विषयांवर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी ‘जनशक्ती’ व ‘भाजप’च्या सदस्यांत नाराजी दिसून आली नाही. अत्यंत खेळीमेळीत पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, सोमवारी पार पडलेल्या स्थायीच्या बैठकीत विषयपत्रिकेत विषयांचा समावेश न केल्याने ‘जनशक्ती’च्या उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांना अखेर दांडीचे शस्त्र उपसावे लागले. जनशक्तीच्या स्थायी समितीतील आठही सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने ती नगराध्यक्षांना रद्द करावी लागली.

पालिकेत सोमवारी पार पडलेल्या बैठकीस नगराध्यक्षांना तब्बल दोन तास वाट पाहावी लागली. तरीही जनशक्तीचे स्थायी समितीचे सदस्य न आल्याने अखेर सभेचे कोरम पूर्ण झाले नसल्याने नगराध्यक्षांना सभा रद्द करावी लागली. नगराध्यक्षांनी स्थायीची सभा रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही त्यांना अशाप्रकारे सभा रद्द करावी लागली होती. त्यानंतर पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत याचे पडसादही उमटले होते. याहीवेळेस अशाप्रकारे सभा रद्द करण्याची नामुष्की आल्याने तसेच स्थायीच्या सभेत जनशक्तीने मागणी केलेल्या विषयांचा समावेश विषयपत्रिकेत
न केला गेल्याने आगामी सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटणार, हे नक्कीच !

उपनगराध्यक्षांची दांडी तर नगराध्यक्षांचे वॉच अँड वेटिंग
कºहाड पालिकेत नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्या अधिकारांतर्गत विशेष, सर्वसाधारण तसेच स्थायी समितीची सभा घेतली जाते. मात्र, सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीकडे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्यासह समितीच्या सदस्यांनी दांडी मारली तर नगराध्यक्षांसह इतर सदस्यांना त्यांची वाट पाहत बसावे लागले. अखेर सभेचे कोरम पूर्ण न झाल्याने सभा रद्द करावी लागली.

सभेतील प्रकारचा‘लोकशाही’कडून निषेध
कºहाड पालिकेत सोमवारी सत्ताधारी जनशक्ती व भाजपमधील नगरसेवकांमध्ये विषयपत्रिकेत विषय न घेतल्या कारणाने स्थायी समितीची सभा रद्द झाली. मात्र, मागील नोव्हेंबर महिन्यातही असाच प्रकार घडला होता. त्याचा परिणामी नंतर सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाला. या दोघांकडून केल्या जाणाऱ्या कार्यपद्धतीचा विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. अंतर्गत वाद बाजूला ठेवून स्थायीची बैठक घेणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही, असे लेखी निवेदन सौरभ पाटील यांनी मंगळवारी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना दिले

नगराध्यक्षांना निवेदनाद्वारे विचारलेले प्रश्न
१. सभेमध्ये कºहाड शहराच्या विकासाचे विषय
नव्हते काय?
२. सभा रद्द होण्यामागील कारणे कोणती आहेत?
३. पुढील स्थायी समितीची सभा कधी होणार आहे.?
४. नोव्हेंबर २०१७ मध्येही अशाच प्रकारे स्थायी
समितीची सभा रद्द झाली होती. त्यामुळे पालिकेची प्रतिमा पसरविणाºया घटना घडल्या. आताही तसेच होणार का?
५. वारंवार अशा सभा रद्द करणे, हा शहरवासीयांचा विश्वासघात नव्हे काय?
६. राजकीय वादामध्ये शहराच्या विकासास खीळ बसत आहे. यास जबाबदार कोण?

Web Title:  'Janshakti' and 'BJP' controversy protested by 'democracy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.