बलुतेदारीवर संशोधनासाठी जपानची प्राध्यापिका कुडाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:16 PM2018-03-11T23:16:54+5:302018-03-11T23:16:54+5:30
मेढा : बारा बलुतेदार अन् भारतीय कला, भारतीय संस्कृती यांचे एक अनोखं नातं आहे. ही बलुतेदारी पद्धती कशी चालायची याची उत्सुकता आजही परदेशी नागरिकांना आहे. ्याच उत्सुकतेपोटी भारतातील बलुतेदारीवर पीएच.डी. करण्यासाठी जपान येथील प्राध्यापिका टोकुमो ओशिमो या भारतात आल्या असून, त्यांनी रविवारी जावळी तालुक्यातील कुडाळ गावाला भेट दिली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनी पारंपरिक चालीरितींची माहितीही जाणून घेतली.
बारा बलुतेदार अन् बाजारपेठ यांचे पूर्वी एक आर्थिक देवघेव मात्र वस्तू रुपाने असे व्यवहार चालत. यामध्ये बारा बलुतेदार उत्पादन केलेल्या वस्तू ग्राहकांना देत अन् त्याबदल्यात धान्य, वस्तू घेत. आर्थिक नाणी, चलन, नोटा यांचा वापर न करता वस्तूच्या मोबदल्यात वस्तू अशी बाजारपेठ चालायची. मात्र, त्याकाळी नाणी, नोटांचा वापर कमी असल्याने वस्तूचे मूल्य हे वस्तुरुपातच व्हायचे अन् हे व्यवहार कसे व्हायचे, बारा बलुतेदारी अन् बाजारपेठ कशी चालायची यावर जपान येथील विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी जपान येथील प्राध्यापिका टोकुमो ओशिमो या सध्या साºया भारतभर फिरत आहेत.
आज त्यांनी जावळी तालुक्यातील कुडाळ येथे कुंभारवाडा परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी कुंभारवाड्यात विटा, चुली, मडकी, बैल आदी वस्तू कशा बनवल्या जातात. या वस्तू पूर्वी बलुतेदारी पद्धतीने कशा देवघेव केल्या जायच्या, आजही बलुतेदारी सुरू आहे का? आदी विषयाबाबत माहिती घेतली. यावेळी कुंभारवाडा परिसरातील नागरिकांनी याची माहिती देत संत गोरोबा कुंभार यांच्याविषयीही माहिती सांगितली. यावेळी प्राध्यापिका ओशिमो यांनी आपल्या पीएच.डी.मध्ये एक वेगळा विषय म्हणून संत गोरोबा कुंभार यांचे नाव घेण्याबाबत सूतोवाच केले. यावेळी न्हावी, चांभार आदी समाजातील व्यवसायाबाबतही त्यांनी माहिती घेतली.
त्यांचेबरोबर दुभाषी म्हणून पुणे येथील वर्षा कोंडवीकर होत्या. कुडाळचे सरपंच वीरेंद्र शिंदे
यांनी स्वागत केले. यावेळी मालोजीराव शिंदे, राहुल ननावरे, कांबळे गुरुजी, ग्रामविकास अधिकारी पालवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आठ वर्षांनंतर पुन्हा भेट
प्राध्यापिका ओशिमो या आठ वर्षांपूर्वी कुडाळ येथे आल्या होत्या. येथील शमराव शिंदे यांच्या घरी त्यांनी पाहूणचार घेतला होता. याचवेळी त्यांनी बारा बलुतेदारी संदर्भात ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली होती. बलुतेदारीवर संशोधन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.