दुर्लक्षित लेखणीला ‘जशराज’ परिवाराचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 11:29 PM2017-08-07T23:29:45+5:302017-08-07T23:29:49+5:30

'Jashraj' family's power to ignore ignorance | दुर्लक्षित लेखणीला ‘जशराज’ परिवाराचे बळ

दुर्लक्षित लेखणीला ‘जशराज’ परिवाराचे बळ

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोपर्डे हवेली : अनेक कथा, कादंबºया लिहिलेल्या व शालेय पाठ्यपुस्तकातील अभ्याक्रमात ज्यांची कथा सामाविष्ट करण्यात आली आहे. असे मरळी, ता. कºहाड येथील शंकर कवळे यांच्या जीवनाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्यावर मदतीचा ओघ सुरू झाला. मरळीतील या अडगळीच्या लेखकाच्या जीवनाची कहाणी आता सर्वत्र पसरू लागली आहे. त्याची माहिती मिळताच कºहाड उत्तरमधील जशराज पाटील मित्र परिवाराने त्यांना नुकताच ११ हजार १११ रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
कºहाड तालुक्यातील मरळी या छोट्याशा गावात राहणाºया शंकर कवळे यांनी आपली लेखनाची कला घरसंसाराची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे बाजूला ठेवली. गवंडी काम करताना त्यांनी केलेले लिखाण हे काळाच्या ओघात अडगळीत पडले होते. याबाबत त्यांच्या अडगळीच्या जीवनातील संघर्षाची ‘लोकमत’ला माहिती समजताच ती जगासमोर मांडली. आणि त्यातून या अडगळीच्या लेखकावर मदतीचा ओघ सुरू झाला. या लेखकाला नुकताच जशराज पाटील मित्र परिवारातर्फे मदतीचा धनादेशही दिला.
यावेळी सिद्धार्थ चव्हाण, भास्करराव कुंभार, पांडुरंग सावंत, प्रकाश पिसाळ, धैर्यशील पाटील, महंमद मुलाणी, महेश चव्हाण, गणेश चव्हाण, सागर चव्हाण, मोहन चव्हाण, अजित चव्हाण या जशराज पाटील मित्र परिवारातील सदस्यांच्या हस्ते शंकर कवळे यांना धनादेश देण्यात आला. यावेळी मरळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कºहाड तालुक्यातील मरळी गावात गवंड्यांच्या हाताखाली काम करणारे शंकर कवळे यांच्यावर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ‘लोकमत’ने त्यांच्या जीवनातील कहाणी जगासमोर मांडल्याने त्यांच्या कष्टरुपी संसाराला आता बळ मिळू लागले आहे.

Web Title: 'Jashraj' family's power to ignore ignorance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.