जवानांच्या लक्षवेधी कसरतींचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:35 PM2018-12-16T23:35:27+5:302018-12-16T23:35:32+5:30
कºहाड : मराठी संस्कृतीचे प्रदर्शन, पोलीस तसेच लष्करी शिस्तीचे दर्शन, डेअरडेव्हिल्सच्या बायकर्सचे काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट आणि स्किर्इंग, एरो ...
कºहाड : मराठी संस्कृतीचे प्रदर्शन, पोलीस तसेच लष्करी शिस्तीचे दर्शन, डेअरडेव्हिल्सच्या बायकर्सचे काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट आणि स्किर्इंग, एरो मॉडेलिंगच्या कसरतींनी रविवारी कºहाडमध्ये विजय दिवस साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी स्टेडियमवर साजरा करण्यात आलेल्या एकविसाव्या विजय दिवस सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या सुमारे पंधरा हजार नागरिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. चार वर्षांच्या कालावधीनंतर बेंगलोरच्या इंडियन आर्मी डेअरडेव्हिल्स दुचाकीस्वारांनी सादर केलेले अविश्वसनीय स्टंट्स, तब्बल ३ हजार फूट उंचीवरून मारलेली पॅराशूट जम्प, संतोष जाधव यांनी दाखवलेले रिव्हर्स रिक्षा चालवण्याचे अविश्वसनीय कौशल्य समारोहाचे आकर्षण ठरले.
भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजय दिवस समारोह समितीच्या वतीने विजय दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. विजय दिवस ज्योतीचे प्रज्वलन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, विजय दिवस समारोह समितीचे प्रमुख कर्नल संभाजी पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. खेळाडूंनी आणलेल्या विजय दिवस ज्योतीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या ज्योतीपाठोपाठ पारंपरिक वेशभूषेतील बाईक रॅलीतील महिला दाखल झाल्या. या रॅलीत शंभरहून अधिक दुचाकीस्वार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापाठोपाठ पोलीस, एनसीसी, सीआरपीएफ, कºहाड शहर पोलीस ठाण्याचे निर्भया पथक, बँड पथके यांनी प्रमुख पाहुण्यांना संचलनाने मानवंदना दिली.
प्रारंभी मीनल ढापरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलेले विठ्ठल गीत सादर करण्यात आले. आष्ट्याच्या महात्मा गांधी विद्यार्थ्यांनी केवळ शिट्टीच्या आवाजावर नियंत्रित केली जाणारी कंटिन्युटी व्हिसल ड्रील सादर केली. बॉम्बे सॅफर्स क्लबच्या जिम्नॅस्टिकपटूंनी अतिशय नेत्रदीपक जिम्नॅस्टिक प्रात्याक्षिके दाखवली. करवडी येथील एंजल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झांजपथक वादन सादर केले.
आॅटो रिक्षासारख्या वाहनातूनही स्टंट करता येतात, याचा साक्षात्कार संतोष जाधव यांनी करून दिला. जाधव यांनी गतीने रिक्षा रिव्हर्स गिअरमध्ये चालवणे तसेच बाजूच्या आणि मागील दोन चाकांवर उभी करणे यासारखे अविश्वसनीय स्टंट दाखवले. पेठ वडगाव येथील गुरुकुल अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर स्किर्इंग म्हणजेच दोरीवरील उड्या तसेच दांडपट्ट्याचे प्रात्याधिक सादर करून उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. शेकडो फूट उंचीवरून स्टेडियमवर उतरलेल्या तीन पॅरामोटर्सधारकांनी आपल्या अप्रतिम कौशल्याने सर्वांची मने जिंकली.
रविवारचा दिवस असल्यामुळे विजय दिवस सोहळ्यासाठी शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आले होते. त्यामुळे दुपारी दोन वाजल्यानंतर शिवाजी स्टेडियमवर नागरीकांनी गर्दी केली होती.
मल्लखांब, कुकरी डान्स
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी मल्लखांबाचे १२ प्रकार सादर केले. याच सैन्य दलाच्या तुकडीने मराठमोळा खेळ असणाºया झांजपथक आणि लेझीम खेळाची प्रात्याक्षिकेही दाखवली. गुरखा रेजिमेंटच्या जवानांनी पारंपरिक नेपाळी नृत्य असणाºया कुकरी डान्सचे प्रात्याक्षिक दाखवले. आर्मी डॉग पथकामधील देखण्या श्वानांनी आपल्या ट्रेनरच्या सूचनेनुसार विविध कवायती सादर करून आपल्या स्वामी निष्ठेबरोबरच कौशल्याचेही प्रदर्शन घडवले.