जावळीचा शैक्षणिक वारसा यशस्वीपणे सुरू राहील : अरुणा यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:14+5:302021-08-22T04:41:14+5:30
कुडाळ : ‘जावळीच्या शिक्षण विभागाला आजपर्यंत चांगले अधिकारी लाभले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी उत्तम शैक्षणिक परंपरा निर्माण झाली आहे. ...
कुडाळ : ‘जावळीच्या शिक्षण विभागाला आजपर्यंत चांगले अधिकारी लाभले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी उत्तम शैक्षणिक परंपरा निर्माण झाली आहे. यापुढील काळात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रही भूमिका असेल तसेच जावळीचा हा शैक्षणिक वारसा यशस्वीपणे सुरू ठेवून यात निश्चित भर पडेल’, असे मत जावळीच्या नूतन गटशिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी व्यक्त केले.
जावळी शिक्षक समितीच्यावतीने आयोजित स्वागत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समितीचे तालुकाध्यक्ष सुरेश चिकणे, पतसंस्था अध्यक्ष धीरेश गोळे, उपाध्यक्ष रंजना सपकाळ, कार्याध्यक्ष विजय बांदल, सरचिटणीस तानाजी आगुंडे, महिला आघाडी अध्यक्ष मनीषा वाडकर, सरचिटणीस स्वाती बारटक्के, विनायक चोरट, गजानन वारागडे, ज्ञानेश्वर शिर्के, सुनील शिंदे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
यावेळी कोविड काळातील उत्तम कामाबद्दल गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांना शिक्षक समितीच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नितीन मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर तानाजी आगुंडे यांनी आभार मानले.
२० कुडाळ सन्मान
फोटो: जावळी शिक्षक समितीच्यावतीने गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना सन्मानित करण्यात आले.