जयवंतराव भोसले पतसंस्थेची कोरोना काळातही नेत्रदीपक भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:27+5:302021-04-18T04:38:27+5:30

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या प्रेरणेने २० वर्षांपूर्वी ...

Jayawantrao Bhosale Patsanstha's corona period is also eye-catching! | जयवंतराव भोसले पतसंस्थेची कोरोना काळातही नेत्रदीपक भरारी!

जयवंतराव भोसले पतसंस्थेची कोरोना काळातही नेत्रदीपक भरारी!

Next

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या प्रेरणेने २० वर्षांपूर्वी ही पतसंस्था सुरू करण्यात आली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून, सामान्य शेतकरी, कष्टकरी समुदायातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्था कार्यरत आहे. पतसंस्थेस ३१ मार्च, २०२१ अखेर सर्व तरतुदी वजा जाता ७१.५१ लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला असून, संस्थेचा निव्वळ एनपीए हा शून्य टक्के राहिला आहे, तसेच संस्थेकडे १८० कोटी ९५ लाख रुपयांच्या ठेवी असून, १२९ कोटी ९६ लाख रुपयांची कर्जे प्रदान करण्यात आली आहे.

सध्या देशभरात वेगाने फैलावणाऱ्या, कोराना साथीच्या पार्श्वभूमीवरही पतसंस्थेने सर्व संचालक मंडळ, सभासद, खातेदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चांगली काडमगिरी करत, व्यवसाय वृद्धीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेच्या १६ शाखा असून, भविष्यात पतसंस्थेचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा मनोदय संस्थापक डॉ.अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील व व्यवस्थापक ए.के. यादव उपस्थित होते.(वा. प्र.)

फोटो : अतुल भोसले

Web Title: Jayawantrao Bhosale Patsanstha's corona period is also eye-catching!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.