जयकुमार गोरे : विविध ठिकाणी भूमिपूजन

By admin | Published: August 31, 2014 09:45 PM2014-08-31T21:45:31+5:302014-09-01T00:03:44+5:30

१६ कोटींच्या विकासकामांचा डोंगर उभा करू शकलो,

Jaykumar Gore: Bhumi Pujan at various places | जयकुमार गोरे : विविध ठिकाणी भूमिपूजन

जयकुमार गोरे : विविध ठिकाणी भूमिपूजन

Next

दहिवडी: ‘माझ्या राजकीय वाटचालीत दहिवडी गावाची खूप मोलाची साथ लाभली असून, मी दहिवडीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्यामुळेच १६ कोटींच्या विकासकामांचा डोंगर उभा करू शकलो,’ असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.दहिवडी येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या स्मिता वायदंडे, पंचायत समिती सदस्य अतुल जाधव, सरपंच धनाजी जाधव, उपसरपंच बाळासो कोळेकर व ग्रामस्थ तसेच परिसरातील विविध गावचे सरपंच आणि उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.  आ. जयकुमार गोरे म्हणाले, ‘दहिवडी हे माणचे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे माझ्या माणच्या विकासाचा आरसा दहिवडीच्या रूपाने दिसला पाहिजे. त्यासाठी दहिवडीचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात नवीन प्रशासकीय इमारत, मुलांचे व मुलींचे वसतिगृह, क्रीडा संकुल या मुख्य कामांबरोबरच अनेक छोटी-मोठी कामे करण्यात तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे यशस्वी झालो आहे. यापुढेही तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर विकासपर्व सुरूच ठेवायचे आहे.’आ. जयुकुमार गोरे म्हणाले, ‘माण तालुक्यात उरमोडीचे पाणी आणले आहे. माण तालुक्यात जलक्रांती करायची आहे. त्याचे पहिले पाऊल उचलले आहेत. पाणलोटच्या माध्यमातून हरितक्रांतीच्या यशापर्यंत आपण पोहोचलो आहे. आता पाणी आणले आहे, त्यामुळे यापुढील काळात आपल्याला औद्योगिक विकासाकडे लक्ष द्यायचे आहे. त्यामध्येही आपण यशस्वी होऊ’अतुल जाधव म्हणाले, ‘यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात दहिवडीत विकासकामे झाली नव्हती. आ. जयकुमार गोरे यांच्यामुळे दहिवडीत विकासकामांचा डोंगर उभा राहिला आहे.’यावेळी काशीद गल्ली येथील संतसेना महाराज भवन, कोकरेवस्ती येथील समाजमंदिर, गोसावी वस्ती येथे सभामंडप व कटपाळे वस्ती येथील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय काशीद, नितीन देवकर, सुभाष देवकर, डॉ. संजय काशीद, जनार्दन काशीद, बाळासाहेब कोकरे, प्रदीप कोकरे, पोपट कोकरे, तानाजी कोकरे, एकनाथ कोकरे, अरुण गोसावी, धनाजी गोसावी, विजय गोसावी, सुनील गोसावी, सचिन गोसावी, युवराज गोसावी, नाना गोसावी, हरिभाऊ गोसावी, शेखर गोसावी, संतोष गोसावी, तात्यासाहेब कटपाळे, मारुती कटपाळे, हणमंत कटपाळे, उत्तम कटपाळे, प्रदीप कटपाळे, बाळू कटपाळे, दशरथ कटपाळे, लक्ष्मण जाधव, विजय जाधव, सयाजी मोरे, सतीश शिंदे, संदीप जाधव, दत्ता देशमाने, किशोर साळुंखे, धनाजी साळुंखे, रवी सकुंडे आदी उपस्थित होते.यावेळी दहिवडीतील अंतर्गत तसेच वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या तब्बल १.५ कोटी रुपयांच्या नवीन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Jaykumar Gore: Bhumi Pujan at various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.