साताऱ्यात जेसीबीची सात वाहनांना धडक नऊजण जखमी : ब्रेक निकामी - चालकाचा सुटला ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:40 PM2018-03-16T22:40:03+5:302018-03-16T22:40:03+5:30
सातारा : अदालतवाडा परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेसीबीचा ब्रेक निकामी झाल्याने रस्त्याकडेला उभ्या असणाºया सहा वाहनांना धडक बसली.
सातारा : अदालतवाडा परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेसीबीचा ब्रेक निकामी झाल्याने रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या सहा वाहनांना धडक बसली. या अपघातात नऊजण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, समर्थ मंदिर बाजूकडून नगरपालिकेच्या दिशेने येणाºया जेसीबीचा (एमएच १२ एफबी १३९४) ब्रेक फेल झाला. अदालतवाडा परिसरातील उतारावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कारला धडक दिली. त्यानंतर रिक्षा आणि समोरून येणाºया तीन दुचाकींनाही ठोकर मारली. यात नऊजण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सनी विजय पिंपळे (वय २१, कारी, ता. सातारा), सतीश यादवराव मोरे (४३, नुने, ता. सातारा), वैयजंता रावजी डोईफोडे (३०, समर्थनगर) कुंदन जगन्नाथ शेंडे (शाहूपुरी) अशी जखमींची नावे आहेत. तर जेसीबी चालक हर्षद राजा अन्सारी (२२, समर्थ मंदिर) याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात तीन कार, तीन दुचाकी व एका रिक्षाची मोडतोड होऊन नुकसान झाले आहे. या अपघातानंतर अनेकांना काळजी लागली होती. नेमक कोण जखमी झालय, याची चौकशी लोक करत होते.
कारखाली दुचाकी..
जेसीबीने उभ्या कारला धडक दिल्यानंतर कार पाठीमागे असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळली. एवढेच नव्हे तर कारच्या पाठीमागील चाकाखाली दुचाकी अडकली. त्यामुळे दुचाकीचा चुराडा झाला.
मुलीला आली भोवळ
बारा वर्षांची एक मुलगी घटनास्थळी अपघात पाहण्यासाठी आली होती. गाड्यांचा झालेला चुराडा आणि अपघाताची भीषणत: पाहून तिला भोवळ आली. काही नागरिकांनी तिला तत्काळ पाणी पाजले. मात्र, तरीही ती शुद्धीवर येत नव्हती. अखेर तिला एका घरात नेण्यात आले. काही वेळानंतर संबंधित मुलगी शुद्धीवर आली.
पित्याची परवड..
अपघातात अवघ्या तीन वर्षाची मुलगी जखमी झाल्यानंतर तिच्या वडिलाने तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तिला उपचारासाठी दवाखान्यात घेतलं. त्यामुळे पुन्हा ते सिव्हिलला आले.
मोठा अनर्थ टळला
समर्थ मंदिर रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीचा डीपी आहे. जेसीबी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानंतर उताराने वाहन येत असताना चालकाने प्रसंगावधान राखत जेसीबी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही आधार मिळत नसल्याने चालकाने बाजूच्या वाहनांना धडक दिली. दोन कारला धडक बसल्यानंतर जेसीबीचा वेग कमी झाला. जेसीबी डिपीजवळ येत असताना डीपीच्या कडेला असलेल्या छोट्या कड्यामुळे जेसीबी थांबला. तसेच दुपारच्या वेळी रहदारी संख्या कमी असल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.