Satara Crime: अंत्यविधीस जाताना रिक्षाच्या सीटखाली ७ तोळे दागिने ठेवले, चोरट्याने लंपास केले 

By नितीन काळेल | Published: August 11, 2023 06:55 PM2023-08-11T18:55:47+5:302023-08-11T18:56:46+5:30

अवघ्या २४ तासांत पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

Jewelery worth 7 tolas kept under the seat of a rickshaw while going to a funeral was stolen in satara | Satara Crime: अंत्यविधीस जाताना रिक्षाच्या सीटखाली ७ तोळे दागिने ठेवले, चोरट्याने लंपास केले 

Satara Crime: अंत्यविधीस जाताना रिक्षाच्या सीटखाली ७ तोळे दागिने ठेवले, चोरट्याने लंपास केले 

googlenewsNext

सातारा : कवडेवाडी, ता. कोरेगाव येथे अंत्यविधीला जाताना रिक्षाच्या सिटखाली ठेवलेले सोन्याचे ७ तोळे वजानाचे दागिने चोरणाऱ्याच्या मुसक्या अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आवळल्या. तसेच त्याच्याकडून दागिनेही हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कवडेवाडी येथील उषा आनंदराव जगदाळे यांच्या सासूचे दि. ९ आॅगस्ट रोजी निधन झाले होते. अंत्यविधीसाठी मध्यरात्री एकच्या सुमारास सातारा येथून त्या गेल्या होत्या. त्यावेळी गळ्यातील सोन्याचे ७ तोळे वजनाचे दागिने त्यांनी स्वत:च्या रिक्षाच्या सीटखाली पर्समध्ये ठेवले होते. अंत्यविधी करुन परत आल्यावर त्यांना कोणीतरी दागिने चोरुन नेल्याचे लक्षात आले. त्याप्रमाणे त्यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंद केला.

पोलिसांत गुन्हा नोंद होताच पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेळके यांनी गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप बनकर, हवालदार उदय जाधव, प्रशांत गोरे, गणेश इथापे यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर योग्य माहितीच्या आधारे सुहास धनाजी फडतरे (वय २९, रा. देगाव पाटेश्वर. सध्या रा. कवडेवाडी) याला ताब्यात घेतले. तसेच चाैकशीअंती त्याने चोरीची कबुलीही दिली. याप्रकरणी वाठार पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Jewelery worth 7 tolas kept under the seat of a rickshaw while going to a funeral was stolen in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.