‘जिजाऊ’चा दांडिया महोत्सव ‘राजधानी’त सर्वोत्कृष्ठ
By admin | Published: October 23, 2015 10:12 PM2015-10-23T22:12:46+5:302015-10-24T00:31:43+5:30
पूनम शहा ठरली क्विन : सलग चार दिवस महिला अन् युवतींच्या गर्दीचा महापूर; लाखोंच्या बक्षिसांमुळे स्पर्धकही खूश
सातारा : जिजाऊ प्रतिष्ठान आणि शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महिला व तरुणींसाठी आयोजित करण्यात आलेला मोफत ‘राजधानी रास दांडिया’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सातारा येथील पूनम शहा हिने मोठ्या गटात ‘रास दांडिया क्विन’ होण्याचा बहुमान मिळविला. या स्पर्धेतील प्रथम तीन विजेतींना पतीसोबत सात दिवसांची
विमानाने केरळ ट्रीप घडविणार आहे. या व्यतरिक्त स्पर्धेत लाखोंची
बक्षिसे वितरण करण्यात आली. या दांडिया महोत्सवाचे ‘लोकमत’ हे माध्यम प्रायोजक होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जिजाऊ प्रतिष्ठानच्या रास दांडियाला महिलांनी व युवतींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पुन्हा एकदा जिजाऊ प्रतिष्ठानवर महिलांचा असलेला विश्वास सिद्ध झाला. दि. १७ ते २० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते १०.३० पर्यंत चाललेल्या या दांडिया महोत्सवात सुमारे सहा हजार महिलांनी भाग घेतला.
यंदा महोत्सवाचे सलग तिसरे वर्ष होते. नेहमीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात सर्वात जास्त ‘मेगा प्राईज’ असलेली स्पर्धा ठरली. या स्पर्धेतून दररोज ४० बक्षिसे व शेवटच्या दिवशी २०० बक्षिसांचे वितरण करण्यात आले. एकूण ३२४ बक्षिसांची लयलूट करण्यात आली. स्पर्धेसाठी व दांडिया खेळण्यासाठी विनामूल्य प्रवेश असल्याने महिलांमध्ये बक्षीस मिळविण्यासाठी चढाओढ निर्माण झाली होती.
कार्यक्रमाचा बक्षीस वितरण ‘भाजपा’ महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, प्रदेश उपाध्यक्षा व माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या प्रमुख हस्ते व भाजपा जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात, रवींद्र भोसले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर गोडबोले, के्रडाईचे अध्यक्ष व प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर, रॉकिंग हॉलिडेजचे शानभाई आतार, सातारा जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी संग्रामसिंह शिंदे, प्रायोजक विनोद लाहोटी, विकास आढाव, टाटा एआयएचे मॅनेजर प्रवीण पाटील, गणेश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे सिद्धी पवार, रवींद्र पवार यांनी आयोजन केले. ज्योती ठक्कर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिजाऊ प्रतिष्ठानच्या सुचेता यादव, हेमा दिघे, संगीता शर्मा, अणूश्री रजपूत, नीलम रजपूत, स्वाती शेडगे, पुसेगावच्या सरपंच दीपाली मुळे, शिवछत्रपती ट्रस्टचे शैलेश सावंत, अविनाश पवार, विद्याधर डुबल, अनिकेत कुराडे, गोरख खजुरे, नीलेश काळे, गोविंद शर्मा, पुसेगावचे माजी सरपंच भरत मुळे, धीरजराजे जाधव, जीवनधर जाधव यांनी परिश्रम घेतले. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष
सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून कल्याण राक्षे, प्रा. एल. एम. कदम, पंकज चव्हाण यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
प्रथम तीन विजेतींना केरळ ट्रीप
या कार्यक्रमातून ‘टाटा एआयए’ यांच्या तर्फे १०१ महिलांचा प्रत्येकी एक लाखाचा विमा उतरविण्यात आला. शिवाय ‘रॉकिंग हॉलिडेज’ तर्फे स्पर्धेतील प्रथम तीन विजेतींना सात दिवसांची विमान प्रवासासह केरळ ट्रीप देण्यात आली.
दोन विजेतींना हिऱ्याची चमकी
कंग्राळकर असोसिएट्स, थोरात व्हॉल्व्हज, गजानन सुझुकी, ईजी प्लोअर मिल, मिलिंद बारटक्के असोसिएशन, रूपप्रदर्शन ड्रेपरी सेंटर हे प्रायोजक होते, तर हॉटेल सुर्वेज, मॉनजिनीज, पुना गाडगीळ, वर्धमान ज्वेलर्सतर्फे दोन महिलांना हिऱ्याची चमकी देण्यात आली. लाहोटी कलेक्शनतर्फे सर्वोत्कृष्ठ खेळ खेळणाऱ्या पाच महिलांना दररोज साड्या देण्यात आल्या.