जीव धोक्यात घालून धाडसाने वणवा विझविला

By Admin | Published: March 24, 2017 12:19 AM2017-03-24T00:19:29+5:302017-03-24T00:19:29+5:30

वाईची तरुणाई : सोनजाई डोंगरावरील जीवसृष्टी अन् वनौषधी सुरक्षित

Jive in danger and extinguished the life | जीव धोक्यात घालून धाडसाने वणवा विझविला

जीव धोक्यात घालून धाडसाने वणवा विझविला

googlenewsNext



वाई : पर्यावरण रक्षणासाठी तरुणाई आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. वाईत पसरणी घाटात दुपारी सोनजाईच्या डोंगराला लागलेला वणवा जीव धोक्यात घालून अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने विझवून
येथील तरुणाईने नवा आदर्श निर्माण
केला आहे. डोंगरावरील वनऔषधी आणि झाडे वाचविण्याबरोबरच वन्यजिवांच्या रक्षणाचे मोठे
कामही या तरुणांनी करून दाखविले आहे.
वाई शहराच्या दक्षिण-उत्तर बाजूस ही डोंगर आहेत़ येथूनच पाचगणी, महाबळेश्वरला जाणारा पसरणी घाट आहे़ सोमवारी दुपारनतंर पसरणी घाटावरील सोनजाईच्या डोंगराला वणवा लागला़ या डोंगरावर वारंवार वणवा लागत असतो़ बघता-बघता सोशल मीडियावरून ही घटना सामाजिक संस्थांच्या गु्रपवरून फिरू लागली़
मग वाईतीलच प्रसाद सुळके, अनिल यादव, गणेश नेवसे, आशिष शिंदे, ऋषिकेश सरडे, विनय जमदाडे या तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून कोणतीही सुरक्षा साधने नसताना केवळ हिरव्या डाहाळ्यांच्या साह्याने वणवा आटोक्यात आणण्यास सुरुवात केली़
वाऱ्याचा जोेर, उंच वाळके गवत, वणव्याचा वाढता जोर या अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी वणवा विझविला व डोंगराचा काही भाग वाचविला़
दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे़ हिरवेगार डोंगर काही दिवसांतच गवत वाळल्याने वाळून गेले़ पशू, पक्षी अनेक दुर्मीळ वन्यजिवांची अन्न, पाण्यासाठी वणवण सुरू आहे़ वाई तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत़ निसर्गाच्या वैविध्यतेने नटलेल्या या डोंगररांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती, औषधी वनस्पती वास्तव्यास आहेत़; पण काही विघ्नसंतोषी लोकांकडून चुकीच्या गैरसमजुतीतून जाणीवपूर्वक या डोंगरांना आगी लावण्याचे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत़ वनविभागाने दोेषींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होताना दिसत नाही.
त्यामुळे या वणवा लावणाऱ्या प्रवृत्तींचे फावताना दिसत आहे़ यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळताना दिसत आहे़ तरी वनविभागाने वणवा लावणाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेंमीकडून जोर धरू लागला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Jive in danger and extinguished the life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.