कोरोनाकाळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:01+5:302021-06-23T04:26:01+5:30

सातारा : जिल्हा परिषदेत कार्यरत असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना वारसांच्या नोकरी मिळणार आहे. या काळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ...

Jobs to heirs of employees who died during the Coronation period | कोरोनाकाळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी

कोरोनाकाळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी

googlenewsNext

सातारा : जिल्हा परिषदेत कार्यरत असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना वारसांच्या नोकरी मिळणार आहे. या काळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांतील वारसदाराने सज्ञान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यानंतर अनुकंपा तत्त्वातून वारसदारांना नोकरी मिळणार आहे.

कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत होते. आतापर्यंत जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील २४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. यामधील, ५ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा विमा मिळाला असून, उर्वरित प्रस्ताव राज्यशासनास पाठविले आहेत. तसेच, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी राज्य शासनाने योजना लागू केली आहे. यामध्ये कोरोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांनी अनुकंपावरील नियुक्तीच्या योजनेची माहिती, पात्र नातेवाईक, अर्ज करण्याची मुदत, शैक्षणिक आर्हता, टंकलेखन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

दरम्यान, कोरोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे पात्र वारसदार सज्ञान नसल्यास अर्ज करता येणार नाही. ते वारसदार सज्ञान झाल्यानंतर एका वर्षाच्या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. यामध्येही कुटुंब निवृत्तीवेतन धारकाला वेतन विषयक कागदपत्रांची पूर्तता करताना लेखी कळविणे संबंधित आस्थापना अधिकाºयाला बंधनकारक आहे. जोपर्यंत अनुकंपा नियुक्तीसाठी आवश्यक कागदपत्रे उमेदवारांकडून प्राप्त होत नाहीत. तोपर्यंत वारसदारांचे नाव समाविष्ट करता येत नसल्याचे. स्पष्ट करण्यात आले आहे.

...............

कोट :

कोरोनाकाळात जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा विमा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या वारसांना अनुकंपा अंतर्गत नोकरी मिळविण्यासाठी वारस सज्ञान झाल्यानंतर अर्ज करणे बांधनकारक आहे. याबाबतचे अर्ज घेण्याबाबत सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना कळविण्यात आलेले आहे.

- मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

......................................................................

Web Title: Jobs to heirs of employees who died during the Coronation period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.