पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:46 AM2021-09-09T04:46:32+5:302021-09-09T04:46:32+5:30
कराड : पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारितेमध्ये निर्भीड आणि वास्तववादी लेखणीत समाज घडविण्याची ताकद असते त्यामुळे पत्रकारांनी ...
कराड : पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारितेमध्ये निर्भीड आणि वास्तववादी लेखणीत समाज घडविण्याची ताकद असते त्यामुळे पत्रकारांनी समाजहिताचे भान ठेऊन सकारात्मक पत्रकारिता करावी, असे आवाहन कराड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले.
आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान, पाडळी (केसे) यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 'तिरंगा रक्षक समाजगौरव पुरस्कार' वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, जेष्ठ पत्रकार, प्रा. अशोक चव्हाण, पत्रकार विद्याधर गायकवाड, आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, रुपाली जाधव, सामाजिक कार्यकर्ते सलीम मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बी. आर. पाटील म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना ज्यांच्यावर कौतुकाची थाप पडते याचा अर्थ त्यांचे कौतुक तर होतेच पण त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा मात्र वाढतात. अर्थातच सत्काराने सत्कारमूर्तींची जबाबदारी मात्र वाढते.
यावेळी सुनील परीट, दशरथ पवार, चंद्रकांत पवार, विद्याधर गायकवाड, विकास म्हस्के, वसीम सय्यद, विजय पाटील, जुबेदा मुजावर, प्रशांत गाडे, आदर्शमाता प्रतिष्ठानचे संपतराव मोहिते, ज्योश्ना मोहिते, अनिल बडेकर, पाडळी (केसे) ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर आदींची उपस्थिती होती.