ंसायकलवरून तेरा दिवसांत १४०० किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:03 AM2018-01-15T00:03:48+5:302018-01-15T00:03:48+5:30

The journey from 1400 kms to the buses in the 13 days | ंसायकलवरून तेरा दिवसांत १४०० किलोमीटरचा प्रवास

ंसायकलवरून तेरा दिवसांत १४०० किलोमीटरचा प्रवास

googlenewsNext


मायणी : येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य विजय वरुडे व शिवाजी कणसे यांच्यासह मिरज व पुणे येथील चौघांनी सायकलवरून तेरा दिवसांत १,४०० किलोमीटरचा प्रवास केला. सायकलवर ‘पर्यावरण वाचवा, प्रदूषणाला आळा घाला,’ यासारखे संदेश लिहून समाजप्रबोधनही केले.
कन्याकुमारीला जाण्यासाठी आठरा दिवसांपूर्वी सायकलवरून प्रस्थान केले होते. हे आंतर पूर्ण करण्यासाठी सायकलींवरून तेरा दिवस लागले. या दिवसामध्ये बेंगलोर, मदुराई, सेलमयासह दक्षिण भारतात व्यवसायानिमित्त असलेल्या मराठी माणसांनी त्यांचे स्वागत केले.
केवळ सायकल चालवून हा विक्रम करण्याचा उद्देश न ठेवता वाहनांमुळे प्रदूषण होत आहे. पर्यावरणाचाही ºहास होत चालला आहे. ‘सायकल चालवा पर्यावरणाचा समतोल राखा,’ असे विविध संदेश सायकलवर लिहिले होते. परतीचा प्रवास रेल्वेने करून ते शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मायणी येथे पोहोचले. यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत हार, बुफे देऊन मिठाई भरवून स्वागत केले.
अनिल कुलकर्णी, अंबरीश जोशी, मिलिंद कुलकर्णी, सागर माळवदे या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे चार सदस्यही आहेत. कन्याकुमारी येथे गेल्यानंतर स्वामी विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी मंदिर त्यानंतर रामेश्वरम् येथील धनुष्यकोटी हे रामसेतू बांधलेले ठिकाण, मीनाक्षी मंदिर येथे दर्शन घेऊन कन्याकुमारी ते मिरज हा प्रवास रेल्वेने केला. मिरज येथेही तेथील सायकल व पर्यावरणप्रेमी ग्रुप, सह्याद्री ग्रुप तर्फे शाल श्रीफळ गुलाबपुष्प व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले.
मायणीत उपसरपंच सूरज पाटील, वडूज बाजार समितीचे संचालक किरण देशमुख, किरण कवडे, रणजित माने, हेमंत जाधव, शंकर माळी, चंदन वरुडे, राजेंद्र बाबर, राजाराम कचरे, शंकर भिसे, कृषी अधिकारी दीपक घोणे, सोमनाथ माळी, जयंत लिपारे, मधुकर लिपारे, आबासाहेब माने, सचिन घाडगे, प्रशांत कवडे, प्रमोद महामुनी, डॉ. सुमनकुमार देवनाथ, अश्विन माळी, अशोक कुंबलवर, जगन्नाथ भिसे यांनी स्वागत केले.
इतर सायकलस्वारांनी घेतली भेट
गतवर्षी मायणी ते बालाजी हे अंतर कमी वेळात पार करून मायणीचा रायडर अशी प्रसिद्धी मिळवलेले पत्रकार सुमित ऊर्फ दत्ता कोळी व शाम कवडे यांनी यावर्षी मायणी ते कन्याकुमारी हे १४०० किलोमीटरचे अंतर पार करून या सायकलस्वारांची प्रत्यक्ष कन्याकुमारीत भेट घेतली.

Web Title: The journey from 1400 kms to the buses in the 13 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.