लोणंद-आदर्की फाटा मार्गावरील प्रवास होणार सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:18+5:302021-04-18T04:38:18+5:30

वाठार स्टेशन : लोणंद ते आदर्की फाटा मार्गाच्या कामासाठी १२.८९ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे नागरिकांसाठी धोकादायक बनलेल्या ...

The journey on the Lonand-Adarki fork route will be pleasant | लोणंद-आदर्की फाटा मार्गावरील प्रवास होणार सुखकर

लोणंद-आदर्की फाटा मार्गावरील प्रवास होणार सुखकर

Next

वाठार स्टेशन : लोणंद ते आदर्की फाटा मार्गाच्या कामासाठी १२.८९ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे नागरिकांसाठी धोकादायक बनलेल्या या रस्त्याचे काम आता लवकरच मार्गी लागणार असल्याने महामार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. यामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातून जाणाऱ्या लोणंद ते सातारा महामार्गाची दुरुस्ती व्हावा व मार्ग वाहतुकीस योग्य करण्यात यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागासह केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुण्याचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करून वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार, आदर्की फाटा ते वाढे फाटामध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

याच मार्गावरील आदर्की फाटा ते लोणंदपर्यंतच्या मार्गाचे काम सुरू करण्यात आलेले नव्हते. परिणामी, या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता अशी ओळख असलेल्या या मार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना प्रवास करताना, नाहक त्रास सहन करावा लागत होता.

खराब रस्त्यामुळे अपघातांच्या घटनात वाढ झाल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे लोणंद परिसराच्या अनेक गावांतील ग्रामस्थांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीच्या कामाची मागणी केली होती. खासदार श्रीनिवास पाटील यांनी या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन तशी सूचना केली होती, तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्र लिहून या कामासाठी निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून लोणंद ते आदर्की फाटा रस्ता मजबुतीकरण कामासाठी १२.८९ कोटी निधी मंजूर झाला आहे.

त्यानुसार, निविदा प्रक्रिया तातडीने हाती घेण्याची कार्यवाही या विभागाकडून करण्यात येत आहे. निधी मंजूर झाल्याने खराब झालेल्या महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास जाणार असल्याने दळणवळणासाठी सोयीचे ठरणार आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\\

Web Title: The journey on the Lonand-Adarki fork route will be pleasant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.