पुणे-सातारा प्रवास ठरला १४ तासांचा; साता-यातील युवती गाडीसह गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:43 PM2019-09-26T23:43:20+5:302019-09-26T23:48:00+5:30
पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राहणाºया साताºयातील अमृता आनंद सुदामे या रात्री दहा वाजता कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघाल्या. धायरी येथील पुलावर त्या पोहोचल्या असता अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्या दुचाकीसह वाहून गेल्या.
सातारा : पुण्यामध्ये बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने साताऱ्यातील नोकरदार व इतर प्रवाशांना पुण्याहून साताºयात येण्यास तब्बल १४ तास लागले. रस्त्यावर पडलेली दरड अन् प्रचंड वेगात वाहणाºया पाण्याच्या प्रवाहामुळे
सर्व वाहने जागच्या जागी उभी करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण रात्र प्रवाशांना गाडीतच काढावी लागली.
साता-याहून रोज नोकरीनिमित्त पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रोज सकाळी पुण्याला जाऊन संध्याकाळी परत घरी यायचे, असा साताºयातील अनेकांचा दिनक्रम आहे. मात्र, पुण्यामध्ये बुधवारी रात्री साडेनऊ वाजता पडलेल्या पावसामुळे अनेकांचा हा दिनक्रम विस्कळीत झाला. पुण्यात केवळ पंधरा मिनिटांत पावसाने हाहाकार माजविला होता. जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते. वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. परंतु पुन्हा रात्री दहाच्या सुमारास अचानक पावसाने जोरदार शिरकाव केल्याने रस्त्यावरून पुराचे पाणी वाहू लागले. घराची ओढ लागलेले अनेक सातारकर आपापल्या गाडीमध्ये बसून होते. भारती विद्यापीठ, कात्रजमार्गे रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे अनेक वाहने सिंहगड रस्त्याने बायपासमार्गे साताºयाकडे येण्यासाठी निघाली होती. परंतु कात्रज नवीन बोगद्यापासून आंबेगावदरम्यान असलेल्या रस्त्यावर भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.
वाहने जागच्या जागी उभी राहिली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामधून वाहत असलेले मोठे दगड वाहनांवर जोरदार आदळत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत होते. त्यातच गाडीमध्ये पाणी गेल्याने अनेकांच्या गाड्या बंद पडल्या. खेडशिवापूर येथे काहीजण वाहून गेल्याचे पोलिसांना समजल्यानंतर सर्व ताफा तिकडे गेला. त्यामुळे बराच वेळ प्रवाशांना मदत मिळू शकली नाही. पहाटेच्या सुमारास दरड हटविण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर इंचा-इंचाने वाहतूक पुढे सरकत गेली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी दहाच्या सुमारास ब-यापैकी दरड हटविण्यास पोलिसांना यश आले.
दुस-या दिवशी सकाळी पुण्यात परत येणारे लोक घरी पोहोचलेच नव्हते. त्यांना रात्र गाडीतच काढावी लागली. दुपारी एकच्या सुमारास अनेकजण साताºयात कसे बसे तब्बल १४ तासांनंतर पोहोचले. अनेक दिवसांपासून सातारकर पुण्याला रोज ये-जा करतात. परंतु यंदा पहिल्यांदाच पुण्याहून साताºयात येताना आपल्यावर हा प्रसंग ओढावला, असा थरार अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.
नाईलाजाने कामावर दांडी..
पावसामुळे पुण्यामध्येच अडकल्याने रोज पुण्याहून ये-जा करणाºया सातारकरांनी गुरुवारी मात्र कामावर दांडी मारली. रात्रभर गाडीत बसून राहिल्याने अनेकांची तब्येत बिघडली. त्यामुळे विश्रांती घेणे त्यांनी पसंत केले. पुण्याहून साताºयाला येण्यास जेमतेम दोन तास लागतात. मात्र, बुधवारी तब्बल १४ तास लागल्याने हा दिवस प्रवाशांसाठी कायम स्मरणात राहण्यासारखा आहे.
साता-यातील युवती गाडीसह गेली वाहून
सातारा : पुण्यामध्ये बुधवारी रात्री पडलेल्या पावसातील पुरात साताºयातील विवाहितेचा वाहून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अमृता आनंद सुदामे (वय २८, रा. मंगळवार पेठ, सातारा, सध्या रा. पुणे) असे वाहून गेलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, पुण्यामध्ये बुधवारी रात्री मुसळधार पावसास सुरुवात झाली. कामावरून घरी जाण्याची नागरिकांची लगबग सुरू असतानाच पावसाचा कहर सुरू होता. पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राहणाºया साताºयातील अमृता आनंद सुदामे या रात्री दहा वाजता कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघाल्या. धायरी येथील पुलावर त्या पोहोचल्या असता अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्या दुचाकीसह वाहून गेल्या. रात्री साडेदहाच्या सुमारास त्या नेहमी घरी पोहोचत असत. परंतु बुधवारी रात्री अकरा वाजल्या तरी त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंब्ीायांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुटुंबीयांच्या मदतीने पोलिसांनी अमृता यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास सनसिटीच्या बाजूला असलेल्या क्रिकेटच्या मैदानात पोलिसांना त्यांचा मृतदेह आढळून आला. अमृता यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे. साता-यातील प्रसिद्ध व दिवंगत वकील विलास देशपांडे यांची अमृता ही मुलगी होती. त्यांच्या मृत्यूमुळे साताºयात हळहळ व्यक्त होत आहे. अमृता यांचे शिक्षण अनंत न्यू इंग्लिश स्कूल आणि धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात झाले होते. विवाहानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या होत्या.