रिंगावण यात्रा यशस्वी करावी

By admin | Published: November 19, 2014 09:55 PM2014-11-19T21:55:07+5:302014-11-19T23:27:20+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : आढावा बैठकीत सर्व विभागांना दिल्या सूचना

The journey of the yard will be successful | रिंगावण यात्रा यशस्वी करावी

रिंगावण यात्रा यशस्वी करावी

Next

म्हसवड : ‘येथील रिंगावण यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख यात्रांपैकी एक असून, यात्रेस लाखो भाविक उपस्थित राहतात. त्यांची गैरसोय होऊ नये, यात्रा सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाने सर्व विभागांशी समन्वय ठेवून यात्रा यशस्वी करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
सिद्धनाथ मंदिर परिसरातील भक्त निवासात रिंगावण यात्रेसाठी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, नगराध्यक्ष विजय सिन्हा, अजितराव राजेमाने. उपविभागीय पोलीस अधिकारी माखनेकर, नगरसेवक विजय धट, सुरेश म्हेत्रे, मुख्याधिकारी पल्लवी मोरे-पाटील, युवराज सूयर्वंशी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी गुरव, सचिव राजकुमार गुरव, सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. कोरे, मोहनराव डुबल उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘यात्रेच्या मुख्य दिवशी शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता, कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी पार्किंगची व्यवस्था योग्य प्रकारे करावी. पालिकेने स्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करावी. यात्रेकरूंना अडचण होऊ नये यासाठी मंदिर ट्रस्टने उपाययोजना कराव्यात. आरोग्य खात्याने यंत्रणा सज्ज ठेवावी.’
आमदार गोरे म्हणाले, ‘यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून भाविकांना अडचण येऊ देऊ नये. पोलिसांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करावे. अपवादात्मक घटनांचा बाऊ करून यात्रेकरूंची अडवणूक करू नये.’
आरोग्य, पालिका, ांधकाम, महसूल, एसटी, वीजवितरण आदी विभागांतील अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांचा आढावा मांडला. बैठकीस विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भेसळ रोखण्याची मागणी
अन्नभेसळ प्रतिबंधक कार्यालयाचे अधिकारी गेली अनेक वर्षे यात्रेच्या आढावा बैठकीत येत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ‘या विभागाला नोटीस द्यावी. यात्राकाळात आरोग्यास अपाय झाल्यास अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच यात्राकाळात निकृष्ट खोबरे मोठ्या प्रमाणावर विकले जाते. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी करण्यात आली.

Web Title: The journey of the yard will be successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.