ज्वारीला दर काडीमोड... गहू-हरभराही मातीमोल

By admin | Published: March 11, 2017 10:30 AM2017-03-11T10:30:41+5:302017-03-11T10:30:41+5:30

हमीभाव घसरला : उत्पादन वाढले मात्र दराचे गणित कोलमडले

Jowarila kadimoda ... wheat-gramha matimol | ज्वारीला दर काडीमोड... गहू-हरभराही मातीमोल

ज्वारीला दर काडीमोड... गहू-हरभराही मातीमोल

Next

ज्वारीला दर काडीमोड... गहू-हरभराही मातीमोल

हमीभाव घसरला : उत्पादन वाढले मात्र दराचे गणित कोलमडले

कातरखटाव : खटाव तालुक्यातील पूर्व भागात सध्या रामाच्या पारात, सध्या पहाटेच्या वेळी बळीराजांची साद ऐकायला मिळत आहे. यंदा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची कापणी सुरू असून, गहू-हरभऱ्याचेही दर ढासळले आहे. यावर्षी उत्पादन जादा झाल्यामुळे ज्वारी १८०० ते २००० रुपये प्रतिक्वि ंटल तर दुसरीकडे भरल्या गाडीला चिपाडाचं काय ओझ, अशी कडब्याची अवस्था झालेली दिसून येत आहे.
रब्बी हंगामासाठी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे ज्वारी असो अथवा अन्य कडधान्य उत्पादन भरघोस निघणार असल्याचे चिन्ह दिसून आले की व्यापारीवर्ग दर ढासळून ठेवणार ही ह्यकाळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळे शेतक ऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, ह्यआवक वाढवावी तर चावतंय... न वाढवावी तर पळतंय,ह्ण अशी अवस्था झाली आहे. चार वर्षांच्या दुष्काळी वातावरणानंतर शेतकऱ्यांसाठी ज्वारीची भाकरी गोड लागणार असली तरी मालाची आवक वाढल्याने हमीभाव घसरला गेला आहे.
तालुक्याच्या या पूर्व पट्यातल्या शेतक ऱ्यांच्या जमिनी म्हणजे पावसाच्या भरवशावरच्या जमिनी त्यामुळे सर्व खर्च भागून पदरी काही तरी पडावे, अशी अशा बाळगून बसलेल्या शेतक ऱ्यांच्या हाती प्रत्येकवर्षी चमत्कार घडत असतो. ह्यगेल्या हंगामात शेतक ऱ्यांच्या हाती नुसतं बाटूक ज्वारीचं उत्पादन फारच कमी..तर या हंगामात बाटुकाला भाव आला असून, ज्वारीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून तालुक्याच्या पूर्व भागात जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यावर्षी ज्वारीच्या विक्रमी उत्पादनामुळे कडब्याचेही उत्पादन वाढले असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न थोडक्यात मिटणार आहे. मागे वळून पाहता चारा छावण्यांच्या काळात अनेक राज्यकर्त्यांनी हात धुवून घेतले असले तरी गत काही वर्षांत छावण्यांची आवश्यकता भासत नसल्याचे दिसून येत आहे. कडब्यामुळे शेतकरी समाधानी असला तरी ह्यकभी खुशी कभी गमह्ण अशी अवस्था ज्वारी उत्पादकांची होणार आहे. अशाप्रकारे यंदा भरघोस उत्पादन झाल्यामुळे शेतकरी सुखावला असला तरी भाव कोसळल्यामुळे गणितच कोलमडल्या सारखे झालं आहे. (वार्ताहर)
जुनी प्रथा लोप पावतेय
अनेक प्रकारच्या पिकांची काढणी, मळणीची काम यंत्राच्या साह्याने होऊ लागली आहे. आता बाजारात नवनवीन कृषियंत्र येऊ लागल्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीच्या मशागती होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कुंभार, लोहार या कारागिरांची कला लोप पावतं चालल्यामुळे जुन्या प्रथा हळूहळू मोडीत निघत आहेत.

विळं मोडून खिळं करण्याची वेळ..
शेतकऱ्यांना मालाचा हमीभाव स्थिर राहिला पाहिजे. नक्की प्रशासन व्यापाऱ्यांच्या आड दडतंय की व्यापारी प्रशासनांच्या आड दडतायेत हेच कोडं शेतक ऱ्यांला अजून उलगडत नसल्यामुळे शेतकरी ह्यना घर का ना घाट काह्ण झाला आहे. खरीप आणि रब्बी हंगामात नक्की कोणती पिकं करावीत ते तरी सांगा. शेतक ऱ्याने उत्पादन वाढवलं की व्यापाऱ्याला निमित्त झालं म्हणून समजा दर ढासळून ठेवायला. त्यामुळे मालाला योग्य भाव मिळावा जेणेकरून ह्यविळं मोडून खिळंह्ण करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये.
- नामदेव बागल, शेतकरी, कातरखटाव

Web Title: Jowarila kadimoda ... wheat-gramha matimol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.