कोविड रुग्णांची कपडे धुण्यासाठी जम्बो वॉशिंग मशीन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 03:05 PM2020-09-29T15:05:54+5:302020-09-29T15:07:17+5:30
मेढा ग्रामीण रुग्णालयातील कोरोना पेंशटचे कपडे आणि बेडशीट धुवायला कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह रुग्णालय प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. याबाबत समाजमाध्यमातून केलेल आवाहनाला प्रतिसाद देत जावळीकरांनी चक्क जम्बो वॉशिंग मशीनसह अन्य आवश्यक गोष्टींसाठी निधी उभा केला. हे मशीन रुग्णालयाला प्रदान करण्यात आले.
सातारा : मेढा ग्रामीण रुग्णालयातील कोरोना पेंशटचे कपडे आणि बेडशीट धुवायला कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह रुग्णालय प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. याबाबत समाजमाध्यमातून केलेल आवाहनाला प्रतिसाद देत जावळीकरांनी चक्क जम्बो वॉशिंग मशीनसह अन्य आवश्यक गोष्टींसाठी निधी उभा केला. हे मशीन रुग्णालयाला प्रदान करण्यात आले.
जावळी तालुक्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यासाठी विविध दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत. जावळी कोविड इमरजन्सी ग्रुपच्या पुढाकारामुळे मेढा ग्रामीण रुग्णालयाला रुग्णालयातील कोरोना पेशंटचे कपडे व बेडशीट धुवायला माणूस मिळत नसल्याची अडचण लक्षात आली. याविषयी सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शेलार यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर मुंबईस्थित जावळीकर आर. के. धनावडे यांनी जम्बो वॉशिंग मशीन दिली.
जावळी इमरजन्सी ग्रुप मार्फत गरम पाण्याचा फिल्टर व एक आॅॅक्सिजन मशीन ही देण्यात आले. यासाठी अशोक दळवी, संजय म्हसकर, श्रीकांत केसकर, हरिदास बागडे, विजय ह. शिंदे, अनिल कदम, धीरेश गोळे, मंगेश शेलार, संदीप धनवडे, शेलेंद्र धोंडे, रवी कदम, अजित पवारसह अनेक दानशूर व्यक्तींनी मुंबईतून मदत केली आहे.
रुग्णालयासाठी आखाडे गावच्या सरपंच सरिता शेलार यांच्याकडून एक आरओ प्युरीफायर देण्यात आले. यावेळी जावळीचे तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. भगवान मोहिते, केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. साधना कवारे, जावळी कोविड इमरजन्सी ग्रुपच्या जयश्री शेलार, साक्षी सुर्वे, विजय सपकाळ, शशिकांत गुरव आदी उपस्थित होते.