अवघ्या ७५ तासांत ४५ फूट विहीर शारीरिक त्रासापासून सुटका : कष्टाला यांत्रिकीकरणाची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:53 PM2018-08-03T22:53:46+5:302018-08-03T22:54:24+5:30
शेतीच्या सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या विहीर खोदण्याचे काम अतिकष्टाचे व वेळखाऊ असले तरी यांत्रिकीकरणामुळे ते अधिक सोपे होऊ लागले आहे. पोकलॅनच्या साह्याने अवघ्या काही तासांत विहीर खोदण्याचे काम होऊ
संतोष धुमाळ ।
पिंपोडे बुद्रुक : शेतीच्या सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या विहीर खोदण्याचे काम अतिकष्टाचे व वेळखाऊ असले तरी यांत्रिकीकरणामुळे ते अधिक सोपे होऊ लागले आहे. पोकलॅनच्या साह्याने अवघ्या काही तासांत विहीर खोदण्याचे काम होऊ लागल्याने शेतकऱ्यांचे मानसिक अन् शारीरिक त्रास आता कमी होऊ लागले आहेत. कोरेगाव तालुक्यातील आसनगाव येथील शेतकऱ्याने अवघ्या ७५ तासांत ४० फूट घेर अन् ४५ फूट खोल विहिरीचे पोकलेनच्या साह्याने खोदकाम केले.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत सिंचनासाठी विहीर खोदायची असेल तर दररोज
किमान दहा कामगार तेवढीच खोरी, फावडी, गरजेनुसार मालवाहू प्राण्यांची गरज भासत आहे. किमान आठ ते दहा महिने लवाजम्यासह शेतकऱ्याला मानसिक व शारीरिक कष्ट सहन करावे लागत असत. परंतु यांत्रिकीकरणामुळे हेच वेळखाऊ काम अगदी काही तासांत करणे शक्य झाल्याने शेतकºयांचे शारीरिक व मानसिक कष्ट कमी होऊ लागले आहेत. यांत्रिकीकरणामुळे शेतकºयांच्या वेळेत बचत झाली आहे. दरम्यान, अल्पवेळ काम होत असले तरी डिझेलचा वाढत्या किमतीमुळे पोकलेनच्याताशी दरातही वाढ होत असल्याने विहिरी खोदण्याचा खर्चही वाढत आहेत. याशिवाय अल्पशा जागेतही पॉकलेनद्वारे विहीर खुदाई केलीजात असल्याने शेतकऱ्यांची मानसिक व शारीरिक त्रासातून सुटका होत
आहे.
शेतकऱ्यांनी अनुदानाकडे फिरवली पाठ
रोजगार हमी योजनेंर्तगत स्वत:च्या मालकीची विहीर खोदण्यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना साधारणत: तीन लाखांपर्यंत अनुदान दिले जाते; परंतु या अनुदानासाठी शेतकºयांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी व वेळखाऊ धोरणामुळे शेतकरी अनुदानकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे.
शेतातील अनिश्चित उत्पादनामुळे परिसरातील शेतकºयांना केवळ शेतीवर अवलंबून न राहता नोकरी व इतर व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयांसाठी यांत्रिकीकरण सोपं ठरत आहे.
- सूर्यकांत शिंदे, आसनगाव