बाळासाहेब पाटील यांच्यामुळे सामान्यांना न्याय : माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:11+5:302021-08-01T04:36:11+5:30
उंब्रज : ‘पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सहकारातील पैलू असून, त्यांनी राजकारणात सत्तेपेक्षा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे’, ...
उंब्रज : ‘पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सहकारातील पैलू असून, त्यांनी राजकारणात सत्तेपेक्षा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे’, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केले.
उंब्रज येथे उंब्रज व पाल जिल्हा परिषद गट, राष्ट्रवादी उंब्रज शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवराज पाटील, सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, जिल्हा परिषद सदस्य विनिता पलंगे, सोमनाथ जाधव, माणिकराव पाटील, सर्जेराव खंडाईत, सुधाकर जाधव, विजय जाधव, उमेश काशीद, दिगंबर भिसे उपस्थित होते.
देवराज पाटील म्हणाले, ‘नामदार पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून राज्यात कामाचा ठसा उमटवला आहे.’ यावेळी शहाजी क्षीरसागर यांनीही मनोगत व्यक्त केले. शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केले. डी. बी. जाधव यांनी प्रास्तविक केले. विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर सोमनाथ जाधव यांनी आभार मानले. (वा. प्र.)
फोटो
३१ उंब्रज
उंब्रज येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. (छाया : अजय जाधव)