आमदार जयकुमार गोरे यांना जामीन
By admin | Published: January 12, 2017 11:46 PM2017-01-12T23:46:12+5:302017-01-12T23:46:12+5:30
आमदार जयकुमार गोरे यांना जामीन
सातारा : महिलेच्या विनयभंगप्रकरणी अटकेत असलेले माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची न्यायालयाने गुरुवारी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली.
आमदार गोरे यांनी महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा सुमारे दीड महिन्यापूर्वी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर आ. गोरे यांनी न्यायालयात धाव घेऊन तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविला होता. त्या अर्जाची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या ठिकाणीही त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. शहर पोलिस ठाण्यात ते स्वत:हून हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयानोीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. गुरुवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या तपासकार्यामध्ये सहकार्य करणे आणि २५ हजारांच्या जातमुचलक्यावर आमदार गोरे यांची न्यायालयाने मुक्तता केली. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांचा गराडा!
आमदार गोरे यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. न्यायालयाच्या बाहेर त्यांच्या गाड्यांचा ताफा सज्ज होता. गाडीत बसण्यापूर्वी त्यांनी केवळ ‘उद्या आपली भूमिका स्पष्ट करू,’ असे सांगितले. त्यानंतर ते कार्यकर्त्यांसमवेत निघून गेले.