क-हाडला मान्सूनपूर्व पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 02:39 PM2020-05-31T14:39:36+5:302020-05-31T14:40:06+5:30
दरम्यान, क-हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे जोरदार पाºयामुळे पिंपळाचे झाड मोडून ट्रॅक्टरवर पडल्याने दोन ट्रॅक्टरचे नुकसान झाले. तसेच परिसरात काही घरांवरील पत्रेही उडून गेले.
क-हाड : गत महिन्यापासून उकाड्याने हैराण केलेल्या नागरिकांना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दिलासा मिळाला. शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यावेळी जोरदार वारा सुटल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांसह नागरिकांचीही त्रेधा उडाली.
गत दोन महिन्यांपासून अगोदरच लॉकडाऊन व कोरोनामुळे सर्वजण घरात बसून होते. शासनाने लॉकडाऊनमुळे शिथिलता दिल्याने लोक घराबाहेर पडू लागले आहेत. त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. घरातही उकाड्याने हैराण होऊन जात होते. अशात रविवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते.
उकाडाही प्रचंड जाणवत होता. त्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती. रविवारीही सकाळपासून पावसाची चिन्हे होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक वारे वाहू लागले आणि त्यापाठोपाठ पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यानजीक व्यवसाय करणाºया अनेक किरकोळ विक्रेत्यांचीही त्रेधा उडाली.
दरम्यान, क-हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे जोरदार पाºयामुळे पिंपळाचे झाड मोडून ट्रॅक्टरवर पडल्याने दोन ट्रॅक्टरचे नुकसान झाले. तसेच परिसरात काही घरांवरील पत्रेही उडून गेले.