कासला वेध फुलोत्सव बहराचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:01 PM2017-08-11T23:01:46+5:302017-08-11T23:01:46+5:30

Kaasala Vedh Fultura Deaf! | कासला वेध फुलोत्सव बहराचे!

कासला वेध फुलोत्सव बहराचे!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेल्या कास पठारावर तृण, कंद, वेली, आर्किड फुलांचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत. तसेच कास पठार, तलाव परिसरात अल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटक निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत असून सुटीच्या दिवशी कास पठार परिसरात पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होताना दिसत आहे.
शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधता तसेच दुर्मीळ फुलांमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या कास पठाराची ओळख प्रमुख पर्यटनस्थळापैकी एक होय. कास पठारावर चवर, टुथब्रश, कापरू, पंद, पाचगणी आमरी, भुईचक्र, आदी फुले तुरळक प्रमाणात उमलण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्यासह परराज्यातून फुलांचा हंगाम सुरू झाल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पठाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जून ते आॅक्टोबर महिन्यादरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतीना अत्यंत आकर्षक अशा निळया, जांभळ्या, लाल, पांढºया रंगांची फुले येतात. मध्य आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. या पठारावरील सुंदर विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो.
सध्या पांढºया रंगाची फुले तुरळक स्वरूपात येण्यास सुरुवात झाली असल्याने तसेच चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची सततची संततधार, गुलाबी थंडी यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत दाट धुक्यासह पावसाळा ऋतूचा आनंद घेत आहेत.
चवर (हिच्चीनीया कावलीना)
ही वनस्पती सह्याद्रीच्या व कोकण रांगांमध्ये दिसते.आल्याच्या वगार्तील वनस्पती आहे. जमिनीत हळद किंवा आलेसारखे आकाराचे कंद दिसून येतात. याच कंदातून पठारावर पांढºया रंगांची फुले उमलतात. यास चवर किंवा चवेटा म्हणतात. पाने करदळीच्या पानांसारखी लांबट असतात.
आषाढ बाहुली आमरी (हबेनारीया ग्रँडीफलोरीफलोरमीस) : ही वनस्पती जांभ्या खडकात मातीच्या भागात उगवते. याची पाने लहान आकाराची असतात. ती जमिनीलगत असतात. त्यावर देठ असून त्यामध्ये दोन ते तीन फुले येतात. पांढºया रंगांच्या या फुलांचा आकार सुबक बाहुलीसारखा दिसतो.
टुथब्रश : या वनस्पतीला एकाच बाजूने पांढºया रंगांची फुले येतात. ती एखाद्या टूथब्रशच्या आकाराप्रमाणे दिसतात.
पंद (पिंडा कोंकणांसीस) : बटाट्यासारखा कंद असून, त्यातून कोंब बाहेर येऊन षटकोनी आकाराची असते. पांढºया आकाराची फुले येतात. प्राणी, रानडुक्कर, सायाळ आदी तृणभक्षी या घेतात.
कापरू: कड्याच्या ठिकाणी तसेच डबक्या शेजारी दगडावरील शैवालावर येत असून लाल रंगाची पुष्कळ फुले येतात. ही फुले पाहण्यासाठी लांबलांबून वनस्पती प्रेमी येत असतात.

Web Title: Kaasala Vedh Fultura Deaf!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.