कडाक्याच्या थंडीनं सातारकर गारठले, पारा १६ अंशावर : धुक्यामुळं महामार्गावर संथ वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:10 PM2017-12-09T17:10:46+5:302017-12-09T17:16:45+5:30

साताऱ्यासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले. त्यात शुक्रवारी रात्रीपासून पारा अचानक घसरला. शनिवारी सकाळी पारा सरासरी सोळा अंशावर घसरला होता. कडाक्याच्या थंडीमुळे सातारकर गारठले आहेत. महामार्गावर दाट धुके पडलेले असल्याने वाहनचालकांना काही अंतरावरचेही दिसत नव्हते. त्यामुळे संथगतीने वाहने धावत होती.

Kadakya's cold Satarakar sinks, mercury falls to 16 degrees: slow traffic on Dhukya highway | कडाक्याच्या थंडीनं सातारकर गारठले, पारा १६ अंशावर : धुक्यामुळं महामार्गावर संथ वाहतूक

कडाक्याच्या थंडीनं सातारकर गारठले, पारा १६ अंशावर : धुक्यामुळं महामार्गावर संथ वाहतूक

Next
ठळक मुद्देपारा सरासरी सोळा अंशावर घसरला कडाक्याच्या थंडीमुळे सातारकर गारठले तापमानात शुक्रवारी रात्रीपासून मोठा बदलधुक्यामुळं महामार्गावर संथ वाहतूक

सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले. त्यात शुक्रवारी रात्रीपासून पारा अचानक घसरला. शनिवारी सकाळी पारा सरासरी सोळा अंशावर घसरला होता. कडाक्याच्या थंडीमुळे सातारकर गारठले आहेत.

चक्रीवादळामुळे चार दिवसांपूर्वी साताऱ्यात पाऊस झाला होता. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी गायब झाली होती. दरम्यानच्या काळात सकाळी पावसाचा शिंतोडा, दुपारी कडक ऊन तर रात्री थंडी असे तिन्ही ॠतू अनुभवण्याची वेळ सातारकरांवर आली होती.

शहरातील तापमानात शुक्रवारी रात्रीपासून मोठा बदल झाला. अचानक थंडीचे प्रमाण वाढले. शनिवारी पहाटे कडक थंडी पडली होती. त्यातच सकाळची शाळा असल्याने उपस्थितीवर परिणाम जाणवत होता. या थंडीतही फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत फरक पडला नाही. महामार्गावर दाट धुके पडलेले असल्याने वाहनचालकांना काही अंतरावरचेही दिसत नव्हते. त्यामुळे संथगतीने वाहने धावत होती.

Web Title: Kadakya's cold Satarakar sinks, mercury falls to 16 degrees: slow traffic on Dhukya highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.