"वोग स्टार मिसेस इंडिया" या स्पर्धेत फलटणच्या काजल भोईटे यांचे उत्तुंग यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 12:32 PM2023-05-01T12:32:51+5:302023-05-01T12:37:40+5:30

180 स्पर्धकांमधून पटकावला मानाचा किताब

Kajal Bhoite from Phaltan Satara wins the Vogue Star Mrs India competition | "वोग स्टार मिसेस इंडिया" या स्पर्धेत फलटणच्या काजल भोईटे यांचे उत्तुंग यश

"वोग स्टार मिसेस इंडिया" या स्पर्धेत फलटणच्या काजल भोईटे यांचे उत्तुंग यश

googlenewsNext

फलटण, प्रतिनिधी: वोग स्टार मिसेस इंडिया २०२३ च्या प्रतिस्पर्धेत काजल ऋतुराज भोइटे यांनी प्रवेश केला होता. ही एक सौंदर्य प्रतियोगिता असून त्यात संपूर्ण भारतातील उभारलेल्या स्त्रीत्वाच्या प्रतिभावंतांना मान्यता मिळते. या स्पर्धेत काजल भोईटे या विजयी झाल्या असून त्यांच्या या यशाने फलटणसह भोईटे घराण्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचले असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

ही स्पर्धा जयपूर, राजस्थान येथे पार पडली,  यांच्या सातारा जिल्ह्याच्या प्रतिनिधित्वाखाली त्यांनी या स्पर्धेत प्रवेश केला आणि काजल ऋतुराज भोईटे या पहिल्या पंधरा मध्ये निवडल्या गेल्या होत्या. या स्पर्धेसाठी 800 स्पर्धकांतून 180 स्पर्धकांची निवड झाली. काजल भोईटे यांनी त्यांची सजगता आणि उत्कृष्ट कौशल्यांची दृष्टी घेत मिसेस महाराष्ट्र विजेत्या ठरल्या आहेत. अंतिम फेरी जयपूर, राजस्थान येथे झाली यामध्ये काजल भोईटे यांना त्यांच्या स्फूर्तीने आणि उत्कृष्ट कौशल्यांसह शुभेच्छा देत  त्यांच्यासाठी यश आणि भविष्यात समृद्धी येवो असे अनेकांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Kajal Bhoite from Phaltan Satara wins the Vogue Star Mrs India competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.