तिसऱ्या लाटेपूर्वी कलेढोण कुटीर रुग्णालय उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:27 AM2021-05-31T04:27:56+5:302021-05-31T04:27:56+5:30

मायणी : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून, रुग्ण संख्याही कमी होत आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे आरोग्य ...

Kaledhon Cottage Hospital will be set up before the third wave | तिसऱ्या लाटेपूर्वी कलेढोण कुटीर रुग्णालय उभारणार

तिसऱ्या लाटेपूर्वी कलेढोण कुटीर रुग्णालय उभारणार

Next

मायणी : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून, रुग्ण संख्याही कमी होत आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे आरोग्य संघटनेकडून बोलले जात आहे. त्यामुळे कलेढोण (ता. खटाव) येथील कुटीर रुग्णालयाची दुरुस्ती करून हे रुग्णालय संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी कार्यरत करणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

पडळ (ता. खटाव) येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी, कलेढोण येथील कुटीर रुग्णालय इमारतीची पाहणी व नव्याने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, नंदकुमार मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कलेढोण येथील दिवंगत माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले, ग्रामीण कुटीर रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीची पाहणी केली. आरोग्य संघटनेकडून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या कुटीर रुग्णालयाच्या इमारतीची संपूर्ण पाहणी करून इमारत दुरुस्त करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून घेण्याचे आदेश दिले. यावेळी माजी सभापती चंद्रकांत पवार,

वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील तुरुकमाने, डॉ. समीर तांबोळी, सुरेश शिंदे, राजू जुगदर, यशवंत माळी, सोमनाथ शेटे, अनिल दबडे, पोलीसपाटील सचिन शेटे, उस्मान तांबोळी, वर्षा लिगाडे व दोन्ही ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

२९ मायणी कलेढोण

कलेढोण येथील कुटीर रुग्णालयाची पाहणी करताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सुरेंद्र गुदगे आदी मान्यवर उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)

Web Title: Kaledhon Cottage Hospital will be set up before the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.