कमळापूरच्या सरपंच, उपसरपंचासह तिघे अपात्र

By admin | Published: December 23, 2016 11:39 PM2016-12-23T23:39:16+5:302016-12-23T23:39:16+5:30

पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; तक्रारीची दखल

Kamalapur Sarpanch, Upasparpanch with three ineligible | कमळापूरच्या सरपंच, उपसरपंचासह तिघे अपात्र

कमळापूरच्या सरपंच, उपसरपंचासह तिघे अपात्र

Next



सातारा : विकासकामांची प्रत फाडून एकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह तिघांवर मेढा पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.
याबाबत गणेश साईबाबा जगताप (वय ३२, रा. भणंग, ता. जावळी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी दुपारी भणंग येथील पाण्याच्या टाकीशेजारी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी गणेश जगताप यांनी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी यांना विचारले, ‘या रस्त्याचे काम दीपक पवार यांच्या समाजकल्याण फंडातून मंजूर केलेले आहे. तुम्ही उद्घाटन कसे काय करताय?,’ त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेश जगतापच्या हातातील पत्र ओढून घेतले. ते पत्र फाडून टाकून ‘तसे काय नसते,’ असे म्हणून गणेशच्या मुस्काटात मारली. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत असणाऱ्या गणेश साबळे आणि अक्षय जाधव यांनीही हाताने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. या प्रकारानंतर गणेश जगताप हे तेथून पळून गेले. दोघांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते घरात आतून कडी लावून बसले, असेही फिर्यादित म्हटले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Kamalapur Sarpanch, Upasparpanch with three ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.